समृद्धी महामार्गावरील मजुरांना 5 महिन्यापासून वेतनच नाही; मध्यप्रदेशातील 300 मजुरांचं आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले. यानंतर मोदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जवळ घेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आलेल्या महामार्गाच्या कामासाठी मध्यप्रदेशातील ३०० मजुरांचा वापर करण्यात आला. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून त्यांना वेतनच देण्यात आले नसल्याचे दिसून आले आहे. परिणामी आक्रमक झालेल्या या मजुरांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.

हजारो कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या समृद्धी महामार्गामुळे नागपूर मुंबई जवळ आले आहे. रस्त्यावरून वाहने सुद्धा सुसाट धावायलाही लागल्या मात्र हा रस्ता बुलढाणा जिल्ह्यातील रोडवेज सोल्युशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने तयार केला आहे. या कंपनीकडून गेल्या पाच महिन्यांपासून वेतन न दिल्याचा आरोप करत मध्यप्रदेशातील या 300 हुन अधिक कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे.

बुलढाण्यातील पॅकेज सातचे काम या कंपनीने केले असून तढेंगावं कॅम्प मधील ३०० हुन अधिक मजुरांना त्यांची मजुरी तब्बल पाच महिन्यापासून मिळाली नाही, असा आरोप या मजुरांचा आहे. हे सर्व मजूर मध्यप्रदेशातील असून या मजुरांवर व कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. आता मजुरांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून कंपनी विरोधात हल्लाबोल सुरु केला आहे.

12 जिल्ह्यातून जाणार समृद्धी महामार्ग

समृद्धी महामार्ग नागपुर ते मुंबई दरम्यान 12 जिल्ह्यातून जाणार आहे. हे जिल्हे पुढिल प्रमाणे – नागपुर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे व मुंबई! तसेच पाच महसुल विभाग येतात. अप्रत्यक्षपणे काही जिल्हे चंद्रपुर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, हिंगोली, परभणी, नांदेड, बिड, धुळे, जळगाव, पालघर व रायगड यांनाही जलद वाहतूकीचा फायदा होणार आहे. जवळपास 26 तालुके व 392 गावांचा संबंध या समृद्धी महामार्गाशी येणार आहे. विदर्भातून 400 किमी, मराठवाड्यातुन 160 किमी व उर्वरित महाराष्ट्रातून 140 किमी असा समस्त महाराष्ट्राला हा महामार्ग दिशादर्शक ठरणार आहे.

7 राष्ट्रीय महामार्ग जोडले जाणार

समृद्धी महामार्गामुळे काही राष्ट्रीय महामार्गही जोडले जाणार आहेत. यात NH 3, NH 6, NH 7, NH 69, NH 204, NH 211, NH 50 यांचा समावेश होतो. महामार्गाची एकुण रुंदी 120 मीटर असणार आहे. प्रत्येक बाजूस चार-चार अश्या आठ पदरी मार्गिका असणार आहेत. मध्य मार्गिका हि 22.5 मिटर आसणार आहे, जी आंतरराष्ट्रीय मानकांनूसार आहे. प्रस्तावित समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा 150 किमी प्रति तास आहे. जर भविष्यात परत महामार्गात वाढ करावयाची झाल्यास ती तरतूद आताच करण्यात आली आहे. त्यामुळे जमिनीचे परत अधिग्रहण होणार नाही हे विशेष. महामार्गात हॉटेल्स, मॉल्स, दवाखाने आदी उभारण्यात येणार आहे.