Samrudhi Expressway : समृद्धी महामार्गावरून धावली 1 कोटी वाहने ; MSRDC च्या तिजोरीत 826 कोटींचा महसूल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Samrudhi Expressway : राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे काम वेगाने पूर्णत्वास येत आहे. त्यानंतर मुंबई – नागपूर एकूण 701 किमीचा हा महामार्ग पूर्णपणे खुला होईल, मुंबई ते नागपूर हे आंतर या महामार्गामुळे एवढ्या 7-8 तासात गाठता येणार आहे. सध्या खुल्या असलेल्या मार्गाला देखील वाहकांनी चांगली पसंती दाखवली असल्याची एका आकडेवारीवरून समोर येत आहे. मागच्या दीड वर्षात या महामार्गावरून (Samrudhi Expressway ) तब्बल 1 कोटी वाहनांनी प्रवास केला असून त्यामुळे MSRDC च्या तिजोरीत 826 कोटींचा गल्ला जमा झाला आहे. चला पाहूया काय संगीतीये नेमकी ही आकडेवारी…

सर्वाधिक वाहतूक मे महिन्यात (Samrudhi Expressway )

समृद्धी महामार्गाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास नागपूर ते इगतपुरी या 625 किलोमीटरच्या मार्गावर सध्या वाहन धावत आहेत. आकडेवारीनुसार या महामार्गावरून दर दिवशी साधारणपणे वीस हजार वाहने धावतात. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत या महामार्गावरून उच्चांकी वाहतुक ही मे महिन्यात झाली असून मे महिन्यात 8, 22,166 वाहनांनी समृद्धी महामार्गावरून प्रवास केला (Samrudhi Expressway ) आहे.

मारग खुला झाल्यानंतर पहिल्या महिन्यात या महामार्गावरून दोन लाख वीस हजार वाहनांनी प्रवास केला होता. त्यातून एमएसआरडीसीच्या तिजोरी 13 कोटी 17 लाख रुपयांचा महसूल जमा झाला होता. त्यानंतर या महामार्गावरून नऊ महिन्यात म्हणजेच ऑगस्ट 2023 मध्ये दरमहा पाच लाख वाहनांचा टप्पा पार केला होता. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून डिसेंबर 2023 मध्ये पहिल्यांदा या महामार्गावरून वाहनांनी सात लाखांचा टप्पा ओलांडला. आता या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय गेल्या काही महिन्यांपासून या महामार्गावरून (Samrudhi Expressway ) दरमहा सात लाखांपेक्षा जास्त वाहने प्रवास करतात.

महामार्गावरील अपघातात 213 जणांनी गमावले प्राण (Samrudhi Expressway )

समृद्धी महामार्ग हा अपघातांच्यामुळे देखील चर्चेत आहे. समृद्धी महामार्ग झाल्यापासून तब्बल 123 अपघातांच्या घटना घडल्या आहेत ज्यामध्ये 213 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुख्यत्वाने गाडीवरील नियंत्रण सुटणे, चालकाला झोप लागणे, टायर फुटणे आणि दोन वाहनांमध्ये योग्य अंतर न राखणे, भरधाव वेग अशी करणे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

समृद्धी महामार्ग हा राज्यातला दुसरा प्रवेश नियंत्रित मार्ग असून 150 किलोमीटर वेगाने वाहने इथं जाऊ शकतात. अशा रीतीने त्याची निर्मिती करण्यात आली आहे. सद्यस्थितीला या महामार्गावर 120 ही वेग मर्यादा आहे. मात्र त्याहून अधिक वेगाने वाहन चालवली जात असल्याचा देखील निदर्शनास येत आहे. त्यामुळे अपघातांची संख्या वाढताना दिसत आहे.वेगाने वाहन चालल्यामुळे आतापर्यंत आठ अपघात (Samrudhi Expressway ) झाले असून त्यात 11 जणांचा मृत्यू झालाय. तर सर्वाधिक अपघात गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झाले आहे. तसेच 37 अपघात घडले असून त्यात 55 जणांचा मृत्यू झाला आहे. तर वाहनांना आग लागण्याच्या दोन घटना घडल्या असून त्यामध्ये 26 जणांनी आपला जीव गमावला आहे. याबाबतची माहिती एम एस आर डी सी कडून देण्यात आली आहे.