Samrudhi Expressway : समृद्धी महामार्गावरील ‘या’ बोगद्यामुळे इगतपुरी – कसारा अंतर केवळ 10 मिनिटांत कापणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Samrudhi Expressway : राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई -नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे काम वेगाने पूर्णत्वास येत आहे. त्यानंतर मुंबई – नागपूर एकूण 701 किमीचा हा महामार्ग पूर्णपणे खुला होईल, मुंबई ते नागपूर हे आंतर या महामार्गामुळे 7-8 तासात गाठता येणार आहे.

मुंबई नागपूर समृद्धी महामार्गातल्या इगतपुरी ते आमने या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याचे काम आता 99% पूर्ण झाले आहे. या मार्गातलं केवळ एक टक्का अखेरचं काम म्हणजे आठ किलोमीटर लांबीचा बोगदा. हा बोगदा या समृद्धी महामार्गाचा मुख्य आकर्षण ठरणार आहे. या बोगद्यामुळे 12 किलोमीटरच्या कसारा घाटाची गरज उरणार नाही. तसंच हे अंतर अवघ्या ८ ते १० मिनिटांमध्ये कापले जाणार आहे. याबाबतची माहिती एमएसआरटीसी चे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी एका माध्यमाशी बोलताना (Samrudhi Expressway) दिली आहे.

99% काम पूर्ण (Samrudhi Expressway)

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा एकूण 701 किलोमीटरचा मार्ग आहे यापैकी 625 किलोमीटरचा महामार्ग हा खुला झाला असून केवळ 76 किलोमीटर मार्गाचे काम सुरू आहे. त्यातही हे काम 99% पूर्ण झाले असून चौथ्या टप्प्यातल्या या महामार्गावर पाच बोगदे आणि 16 पूल असणार आहेत. समृद्धी महामार्गाच्या या चौथ्या टप्प्यातला सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे आठ किलोमीटरचा बोगदा. या बोगद्यामुळे कसारा घाट लागणारच नाही. तसंच सध्याचे अंतर जे 12 किलोमीटर आहे जे कापण्यासाठी 40 मिनिटे लागतात मात्र हा बोगदा सुरू झाल्यानंतर हे हे अंतर अवघ्या आठ ते दहा मिनिटांमध्ये कापले जाणार आहे. आता या बोगदाचे काम तितकच आव्हानात्मक आहे. सगळी आव्हानं पेलून आम्ही तो तयार केला (Samrudhi Expressway) अशी माहिती देखील अनिल कुमार गायकवाड यांनी दिली आहे.

इगतपुरी – कसारा केवळ 10 मिनिटांत (Samrudhi Expressway)

समृद्धी महामार्गाच्या चौथ्या टप्प्यातला मार्ग हा नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांना जोडतो. सह्याद्रीच्या खडतर पर्वत रांगांमधून मार्ग काढून हे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पूर्ण केले आहे. पॅकेज 14 हा इगतपुरी येथील आठ किलोमीटरचा बोगदा महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा आहे. तसेच देशातील सर्वाधिक रुंद असा हा बोगदा आहे. या बोगदाची रुंदी 17.61 मीटर इतकी, तर या बोगद्याची उंची ही 9.12 मीटर इतकी आहे. त्यामुळे इगतपुरी ते कसारा हे अंतर आठ ते दहा मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन नाशिकला जोडणाऱ्या कसारा (Samrudhi Expressway) घाटाला पर्यायी मार्ग झाल्यामुळे वाहतूक आणखी जलद होणार आहे.

बोगदे बांधणे आव्हानात्मक (Samrudhi Expressway)

समृद्धी महामार्गाच्या चौथ्या टप्प्यात व्हॅली पूल बांधणे आणि बोगदे बांधणं हे सर्वात मोठं आव्हानात्मक काम होतं काही ठिकाणी खडकात 30 ते 40 मीटर पर्यंत खोदकाम करावे लागलं आणि या टप्प्यात 16 व्हॅली पूल आहेत. तसेच पॅकेज 15 मध्ये खोल दरी असल्याने पुलाच्या खांबांची उंची 84 मीटर आहे म्हणजे एखाद्या 25 ते 28 मजली इमारती इतकी ही उंची आहे असे देखील गायकवाड यांनी सांगितलं