Samrudhi Expressway : मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आता पुर्णत्वाकडे येत आहे. 701 किलोमीटर लांबीचा असलेला हा महामार्ग 99% पूर्ण झाला असून केवळ या महामार्गाचे एक टक्का काम अपूर्ण आहे. दरम्यान समृद्धी महामार्गाबाबत एक नवीन अपडेट आता समोर येत आहे. समृद्धी महामार्गाला आता भारतातल्या सर्वात मोठ्या बंदराची जोडणी करण्यात येणार आहे. आता तुम्ही विचार करत असाल हे बंदर कोणते? तर हे बंदर आहे पालघर जिल्ह्यातलं वाढवणं बंदर… वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्ग जोडण्यात येणार आहेत.
हा महामार्ग इगतपुरी ते चारोटी असा 90 किलोमीटरचा प्रस्तावित करण्यात आला आहे. या महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील मालाची वाहतूक आता थेट वाढवण (Samrudhi Expressway) बंदरात करता येणार आहे. या मार्गाचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक देखील करण्यात आल्याची माहिती आहे. चला जाणून घेऊया काय आहे हा नवा प्रकल्प
इगतपुरी ते वाढवण असा 123.4 किलोमीटरचा नवा मार्ग (Samrudhi Expressway)
नागपूर ते मुंबई असा समृद्धी महामार्ग येत्या सप्टेंबर अखेरीस भिवंडी पर्यंत सेवेत येणार आहे. त्यामुळे मुंबई ते नागपूर हे अंतर अवघ्या आठ तासांमध्ये पूर्ण होणार आहे. त्याबरोबरच या महामार्गाचा आणखी विस्तार करण्यात येणार असून इगतपुरी ते वाढवण असा 123.4 किलोमीटरचा नवा मार्ग तयार करण्यात येत आहे. त्यामुळे इगतपुरी इथून निघालेली वाहन दीड ते दोन तासात वाढवन बंदरापर्यंत पोहोचणार आहेत.
काय आहेत वैशिष्ट्ये ? (Samrudhi Expressway)
- इगतपुरी ते चारोटी असा महामार्ग एमएमआरडीसी यांच्याकडून तयार केला जात आहे.
- 90 किलोमीटरच्या या मार्गासाठी 9000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित
- दिल्ली मुंबई महामार्गावरून उत्तरेकडून आलेल्या वाहनांना वाढवून बंदरात पोहोचण्यासाठी 33.4 किलोमीटरचा आणि 120 मीटर रुंदीचा ग्रीनफिल्ड महामार्ग उभारला जात आहे.
- चारोटी इथूनच हा महामार्ग सुरू होणाऱ्या तर समृद्धी महामार्गावरून येणारा कनेक्टर चारोटी इथं या मार्गाला जोडण्याचा विचार होत आहे.
मराठवाडा विदर्भाच्या व्यापार ,उद्योगाला चालना (Samrudhi Expressway)
मराठवाडा आणि विदर्भाला याचा फायदा होणार असून इथे तयार होणाऱ्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्याचा मानस आहे. वाढवण बंदरापर्यंत मराठवाडा विदर्भातल्या मालाची वाहतूक जलद गतीन आणि सुरळीत करण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार (Samrudhi Expressway) आहे. येथील कृषी उत्पादन आणि औद्योगिक उत्पादनात थेट वाढवण बंदरापर्यंत पोहोचवली जाणार असून या बंदरातून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यास मार्ग मोकळा होणार आहे.