Samrudhi Mahamarg : काय सांगता ? वर्षभरातच समृद्धी महामार्गावर भेगा,MSRDC च्या दाव्याचं काय ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Samrudhi Mahamarg : महाराष्ट्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून मुंबई – नागपूर समृद्धी महामार्गाकडे पहिले जाते. एकूण 701 किलोमीटरचा असलेला हा मार्ग आहे. यापैकी 625 किलोमीटरचा मार्ग (Samrudhi Mahamarg ) आतापर्यंत खुला करण्यात आला आहे. मात्र पहिल्याच पावसात या खुल्या झालेल्या रस्त्याला भेगा पडल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे MSRDC च्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

समृद्धी महामार्गाला (Samrudhi Mahamarg ) ह्या भेगा कुठे पडल्या आहेत ? तर छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या माळीवाडा इंटरचेंजजवळ 3 सेंमी रुंदीच्या 50 फूट लांबीच्या भेगा पडल्या आहेत. याबाबतचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एमएसआरडीसीने मोठा गाजावाजा करीत हा रास्ता चांगल्या पद्धतीने बनवला असल्याचा दावा केला होता मात्र पहिल्याच पावसानंतर भेगा पडल्यामुळे त्यांचा हा दावा फोल ठरताना दिसतो आहे. MSRDC ने म्हंटले होते की समृद्धी महामार्ग (Samrudhi Mahamarg ) बनवण्यासाठी एम-40 ग्रेडचं सिमेंट वापरल्यास 20 वर्षे खड्डे पडत नाहीत. त्यामुळे आता त्यांच्या दाव्याचे काय ? असा सवाल सामान्य नागरिकांमधूनही उपस्थित केला जात आहे.

अपघाताची भीती

माळीवाडा इंटरचेंजजवळच पुलावर मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. याशिवाय माळीवाडा एक्सचेंजजवळ मोठ मोठ्या (Samrudhi Mahamarg ) भेगा पडल्या आहेत. तसंच, काही खड्डेदेखील पडले आहेत. त्यामुळं अपघात होऊ शकतात. येथील स्थानिक ग्रामस्थांनी चार दिवसांपूर्वीच प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र, अद्याप याची दखल घेण्यात आलेली नाही, अशी माहिती समोर येते आहे.

मुंबई ते नागपूर असा 701 किलोमीटर्स चा नियोजित मार्ग आहे. अद्याप हा मार्ग पूर्णपणे सुरु देखील करण्यात आला नाही. तरीदेखील निव्वळ वर्षभराच्या आतच महामार्गाची ही आवस्था झाली आहे. त्यामुळे चालकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यापूर्वी देखील खुला झालेला समृद्धी महामार्ग अपघातांच्या मालिकेमुळे चर्चेत आला होता. आता महामार्गावर (Samrudhi Mahamarg ) पडलेल्या भेगा आणि खड्ड्यांमुळे MSRDC च्या कामावर सवाल उपस्थित केले जात आहेत. हा मार्ग बांधून पूर्ण झाल्यावर मुंबई ते नागपूर हे आंतर केवळ 7-8 तासांमध्ये पार करता येणार आहे.