Samsung Announcement | तुटलेला फोन वर्षातून 2 वेळा करू शकता रिपेअर; सॅमसंग कंपनीचा मोठा निर्णय

Samsung Announcement
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Samsung Announcement | जे लोक सॅमसंगचा फोन वापरतात. त्यांच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता सॅमसंग कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केलेली आहे. कंपनीने त्यांच्या प्रॉडक्टच्या संरक्षणासाठी आधीपासूनच Samsung care + हा प्रोग्राम आणलेला आहे. जो कंपनीने आता विनामूल्य देखील केलेला आहे. त्यामुळे आता सॅमसंग युजर्सला त्यांचे डिवाइस वर्षातून दोन वेळा दुरुस्त करता येणार आहे. तसेच त्यांच्या स्क्रीनचे संरक्षण आणि लिक्विड डॅमेज संरक्षणाचा लाभ देखील घेऊ शकतात. Samsung care + हा गॅलेक्सी उपकरणांसाठी एक स्कीम आहे.

त्यामुळे आता सॅमसंगचे (Samsung Announcement) युजर100% सुरक्षा प्राप्त करू शकतात. युजर्सला वॉक इन आणि पीक अपची देखील सुविधा उपलब्ध आहे. ग्राहक त्यांच्या सोयीनुसार यापैकी कोणताही एक पर्याय निवडू शकतात. त्यांच्या उपकरणाची दुरुस्ती करू शकतात. Samsung care + याबाबत या कंपनीचा असा दावा आहे की, सॅमसंग उत्पादनांच्या दुरुस्तीसाठी अस्सल भाग वापरण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे या उपकरणांच्या कार्यक्षमतेसह कोणत्याही प्रकारची तडजोड केली जात नाही. हे उपकरण अगदी नवीन उपकरणांप्रमाणेच काम करते.

Samsung care + | Samsung Announcement

या Samsung care + ची सुरुवातीची किंमत ही 399 एवढी आहे. जी संपूर्ण गॅलेक्सी श्रेणी कव्हर करते. यामध्ये गॅलेक्सी स्मार्टफोन्स, गॅलेक्सी टॅबलेट आहे. कोणत्याही कागदपत्राशिवाय तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. त्याचप्रमाण तुमचा डेटा पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित असेल. ग्राहकाला हवे असल्यास दुरुस्ती प्रक्रियेची माहिती घेऊ शकतो. यासाठी एक साधी प्रक्रिया करावी लागेल. तसेच डिवाइस खरेदी करताना तुम्हाला Samsung care + योजना देखील खरेदी करावी लागेल.