हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Samsung ने भारतीय बाजारात सर्वसामान्य ग्राहकाला परवडेल अशा किमतीत नवीन मोबाईल लाँच केला आहे. Samsung Galaxy A06 असं या मोबाईलचे नाव असून यामध्ये 50MP कॅमेरा, 5,000mAh बॅटरी यांसारखे अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. सॅमसंग इंडिया ई-स्टोअरवरून हा स्मार्टफोन तुम्हाला खरेदी करता येईल, तत्पूर्वी आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
6.7-इंचाचा डिस्प्ले –
Samsung Galaxy A06 मध्ये 60Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा IPS LCD पॅनेल डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले HD+ रिझोल्यूशनसह येतो. कंपनीने या मोबाईल मध्ये MediaTek Helio G85 चिपसेट आणि Mali-G52 MP2 GPU वापरला आहे. सॅमसंगचा हा मोबाईल One UI 6.1 आधारित Android 14 वर काम करत असून यामध्ये 4GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज मिळते. तुम्ही मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने हे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवू शकता.
कॅमेरा – Samsung Galaxy A06
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Samsung Galaxy A06 मध्ये पाठीमागील बाजूला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 50MP चा प्राथमिक कॅमेरा आणि 2MP चा सेकंडरी कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 8MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. सॅमसंगच्या या मोबाईल मध्ये पॉवरसाठी ,5,000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, यात ब्लूटूथ v5.3, GPS आणि USB Type-C पोर्ट यांसारखी वैशिष्टये मिळतात.
किंमत किती?
आता राहिला प्रश्न तो म्हणजे किमतीचा, तर जस आम्ही म्हणलं कि हा स्मार्टफोन एकदम स्वस्त आहे त्यानुसार, Samsung Galaxy A06 च्या 4GB + 64GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 9,999 रुपये आहे तर , 4GB + 128GB व्हेरिएंटचा मोबाईल 11,499 रुपयांना उपलब्ध आहे. सध्या हा हँडसेट सॅमसंग इंडिया ई-स्टोअरवर उपलब्ध असून येत्या काही दिवसात तुम्ही हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट- ऍमेझॉन सारख्या ई-कॉमर्स वेबसाइट आणि ऑफलाइन स्टोअर्सवरून खरेदी करू शकता.