हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Samsung ने भारतीय बाजारात A सिरीज लाइनअपचा विस्तार करत Galaxy A26 5G नावाचा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे… आकर्षक फीचर्स आणि परवडणाऱ्या किमतीत हा मोबाईल ग्राहकांना उपलब्ध करण्यात आलाय. यात 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा, 5000mAh बॅटरी सह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आलेत. HDFC आणि SBI क्रेडिट कार्डच्या मदतीने मोबाईल खरेदी केल्यास ग्राहकांना २००० रुपयांची सूट सुद्धा मिळतेय. आज आपण सॅमसंगच्या या मोबाईलचे खास फीचर्स आणि किमतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात..
6.7-इंचाचा डिस्प्ले –
Samsung Galaxy A26 5G मध्ये 6.7-इंचाचा FHD+ Infinity-U सुपर AMOLED डिस्प्ले बसवण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1080×2340 पिक्सेल आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. सॅमसंगच्या या मोबाईल ला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ प्रोटेक्शन मिळतेय. कंपनीने या मोबाईल मध्ये ऑक्टा कोर Exynos 1380 प्रोसेसर बसवला असून हा स्मार्टफोन अँड्रॉइड १५ वर आधारित सॅमसंग वन यूआय ७ या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो…
कॅमेरा – Samsung Galaxy A26 5G
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Samsung Galaxy A26 5G मध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेलचा मॅक्रो देण्यात आलाय. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी समोरील बाजूला १३ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी २५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
किंमत किती ?
Samsung Galaxy A26 5G च्या ८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २४,९९९ रुपये आहे, तर त्याच्या ८ GB रॅम आणि २५६ GB मॉडेलची किंमत २७,९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन काळा, मिंट , पांढरा आणि पीच रंगाच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला असून फ्लिपकार्ट आणि सॅमसंग इंडियाच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअर्समधून खरेदी करता येईल. SBI आणि HDFC क्रेडिट कार्डवरून मोबाईल खरेदी केल्यास ग्राहकांना २००० रुपयांचा डिस्काउंट मिळेल.