Samsung Galaxy F14 : अवघ्या 8999 रुपयांत Samsung ने लाँच केला परवडणारा मोबाईल

Samsung Galaxy F14
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय मोबाईल मार्केट मधील सर्वात लोकप्रिय आणि विश्वासू स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने ग्राहकांना परवडेल अशा अतिशय कमी किमतीत नवा मोबाईल लाँच केला आहे. Samsung Galaxy F14 असं या स्मार्टफोनचे नाव असून यामध्ये 50MP मुख्य कॅमेरासह अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. महत्वाची बाब म्हणजे सॅमसंगचाय या मोबाईलची किंमत अवघी 8999 असल्याने मध्यमवर्गीय ग्राहकाला सुद्धा तो चांगलाच परवडतोय. आज आपण या स्मार्टफोनचे खास फीचर्स जाणून घेऊयात….

6.7-इंचाचा डिस्प्ले –

Samsung Galaxy F14 मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा IPS LCD फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. मोबाईल मध्ये Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर बसवण्यात आला असून सॅमसंगचा हा मोबाईल Android 14 वर आधारित OneUI 6.1 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. मोबाईल मध्ये 4GB रॅम + 64GB स्टोरेज देण्यात आलं आहे. हा फोन 4G LTE सपोर्टसह येतो. यामध्ये तुम्हाला 5G कनेक्टिव्हिटी मिळणार नाही. सॅमसंगचा हा मोबाईल मूनलाइट सिल्व्हर आणि पेपरमिंट ग्रीन कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे.

कॅमेरा – Samsung Galaxy F14

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Samsung Galaxy F14 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो लेन्स देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी मोबाईलच्या समोरील बाजूला 13MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. स्मार्टफोनला पॉवरसाठी 5000mAh बॅटरी बसवण्यात आली आहे असून हि बॅटरी 25W चार्जिंगला सपोर्ट करते. अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, सुरक्षेसाठी साइड फिंगरप्रिंट सेंसर, ड्युअल सिमला सपोर्ट, ब्लूटूथ 5.1 आणि जीपीएस सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. कंपनीने यूजर्सना दोन वर्षासाठी OS अपग्रेड आणि चार वर्षांसाठी सुरक्षा पॅच अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे.