Samsung Galaxy F15 5G मोबाईल नव्या व्हेरिएन्टमध्ये लाँच; मिळतात भन्नाट फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनी Samsung ने आपला Samsung Galaxy F15 5G मोबाईल नव्या व्हेरिएन्टमध्ये लाँच केला आहे. यापूर्वी हा स्मार्टफोन 4GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएन्टमध्ये उपलब्ध होता. मात्र, आता मोबाईलची रॅम वाढवण्यात आली आहे. आता सॅमसंगचा हा मोबाईल 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. मोबाईलची रॅम वाढल्यामुळे त्याची किंमत सुद्धा वाढली आहे.

6.5 इंचाचा डिस्प्ले –

Samsung Galaxy F15 5G मध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्पेला FHD+ रिझोल्यूशन मिळते. कंपनीने मोबाईल मध्ये मीडियाटेक डायमेंशन 6100 चिपसेट बसवली असून ऑक्टाकोर प्रोसेसर Mali-G57 MC2 GPU देण्यात आला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित ऑपरेटिंग सिस्टीमवर चालेल.

कॅमेरा – Samsung Galaxy F15 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, मोबाईलच्या पाठीमागील बाजूला 50MP चा मुख्य कॅमेरा, 5MP चा अल्ट्रा वाईड अँगल आणि +2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तर समोरील बाजूला सेल्फी आणि कॅमेरासाठी समोरील बाजूला 13MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईलला 6,000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 25 वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

मोबाईलच्या किमतीबाबत बोलायचं झाल्यास, Samsung Galaxy F15 5G च्या नव्या व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा मोबाईल काळ्या, हिरव्या आणि व्हायलेट रंगात तुम्ही खरेदी करू शकता. सॅमसंगचे रिटेल स्टोअर आणि फ्लिपकार्टवर हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध आहे.