Samsung Galaxy F55 5G : सॅमसंगने लाँच केला नवा 5G मोबाईल; 50MP कॅमेरासह मिळतात ‘हे’ फीचर्स

Samsung Galaxy F55 5G
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अखेर Samsung Galaxy F55 5G मोबाईल भारतीय बाजारात लाँच झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगबाबत नवनवीन बातम्या समोर येत होत्या, अखेर आज मोबाईल बाजारात दाखल झाला असून यामध्ये ग्राहकांना अनेक भन्नाट फीचर्स पाहायला मिळतील. 50MP कॅमेरा, 12GB रॅमसह या मोबाईल मध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. आज आपण सॅमसंगच्या या नव्या मॉडेलचे खास स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत सविस्तर जाणून घेऊयात …..

6.7-इंचाचा डिस्प्ले –

Samsung Galaxy F55 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 SoC प्रोसेसर बसवला असून हा मोबाईल एंड्रॉइड 14-बेस्ड ONE UI 6.1 वर काम करतो. सॅमसंगच्या या हँडसेट मध्ये 12GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळत. अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास यामध्ये 5G, Wi-Fi, ब्लूटूथ, 4G LTE, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट रीडर आणि USB टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

कॅमेरा – Samsung Galaxy F55 5G

मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Samsung Galaxy F55 5G मध्ये 50 MP चा प्राथमिक सेन्सर, 5 MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. तर समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी 50 MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5,000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत किती?

Samsung Galaxy F55 5G च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपयांपासून सुरू होते. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आणि 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 32,999 रुपये आहे. तुम्ही हा मोबाईल आज रात्री 7 पासून Flipkart आणि Samsung India वरून खरेदी करू शकता. तुम्ही जर HDFC बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून फोन खरेदी केल्यास या मोबाईल खरेदीवर तुम्हाला 2,000रुपयांचा कॅशबॅक मिळेल.