हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय मोबाईल ब्रँड सॅमसंगने भारतीय बाजारात Samsung Galaxy M35 5G नावाचा नवीन मोबाईल लाँच केला आहे. सॅमसंगचा हा स्मार्टफोन 6GB रॅम आणि 8GB रॅम पर्यायात आला आहे. यामध्ये 50MP कॅमेरा, 6000mAh बॅटरीसह अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. आज आपण या मोबाईलची किंमत आणि त्याचे स्पेसिफिकेशन याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
डिस्प्ले –
Samsung Galaxy M35 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.6 इंचाचा FHD+ सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला 1080×2340 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 1000 nits पीक ब्राइटनेसचा सपोर्ट मिळतोय. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस सपोर्ट सुद्धा देण्यात आला आहे. कंपनीने या मोबाईल मध्ये Exynos 1380 चिपसेट बसवली असून हा मोबाईल Android 14 आधारित One UI 6 या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो.
कॅमेरा – Samsung Galaxy M35 5G
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Samsung Galaxy M35 5G मध्ये पाठीमागील बाजूला 50MP चा प्राथमिक कॅमेरा, 8MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 13MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 6000mAh बॅटरी असून ही बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनी या मोबाईलवर ४ वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट्स आणि 5 वर्षांची सुरक्षा अपडेट देत आहे.
किंमत किती?
Samsung Galaxy M35 5G च्या 6GB + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 19,999 रुपये, 8GB + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 21,499 रुपये आणि 8GB + 256GB स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत 24,499 रुपये आहे. हा मोबाईल निळ्या आणि ग्रे कलरमध्ये लाँच करण्यात आलाय. तुम्ही हा स्मार्टफोन Amazon किंवा Samsung वेबसाइटवरून खरेदी करू शकता. सर्व बँक कार्डवर तुम्हाला 2000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.