हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Samsung Galaxy M36 5G। प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Samsung ने भारतीय ग्राहकांसाठी मिड रेंज मोबाईल लाँच केला आहे. Galaxy M36 5G असं या मोबाईलचे नाव असून हा एक 5G स्मार्टफोन आहे. कंपनीने या मोबाईलची किंमत २२,९९९ रुपये ठेवली आहे. या डिव्हाइसमध्ये दमदार प्रोसेसर, AI फीचर्स, कॅमेरा, उपलब्ध आहे. भारतात १२ जुलैपासून हा स्मार्टफोन विक्री साठी उपलब्ध असेल. आज आपण सॅमसंगच्या या मोबाईलचे स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात.
डिस्प्ले –
Samsung Galaxy M36 5G मध्ये १२०Hz रिफ्रेश रेट सह ६.७-इंचाचा FHD+ सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला गोरिल्ला ग्लास व्हिक्टस+ चे प्रोटेक्शन मिळतेय. तसेच या डिस्प्लेला वॉटरड्रॉप नॉच डिझाईन आहे ज्यामुळे मोबाईलचा लूकच खूपच आकर्षक दिसतो. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर Exynos 1380 प्रोसेसर बसवण्यात आला असून सॅमसंग गॅलॅक्सि M36 5G हा अँड्रॉइड 15 वर आधारित One UI 7 या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो. मोबाईल २ स्टोरेज पर्यायासह येतो.. एक म्हणजे 6GB RAM / 128GB स्टोरेज आणि दुसरा म्हणजे 8GB RAM/ 256GB स्टोरेज … कंपनीने ६ वर्षांसाठी अँड्रॉइड आणि सुरक्षा अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे.
कॅमेरा – Samsung Galaxy M36 5G
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Samsung Galaxy M36 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 50MP चा आहे, तर 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 5MP चा मॅक्रो कॅमेराचा समावेश आहे. सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 12MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. फ्रंट आणि रियर दोन्ही कॅमेरे ४ के व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास सक्षम आहेत. पॉवरसाठी मोबाईलला ५,००० एमएएचची बॅटरी देण्यात आली असून हि बॅटरी ४५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. एकदा का मोबाईल फुल्ल चार्ज केला तर हि बॅटरी संपूर्ण दिवस आरामात चालेल असा कंपनीचा दावा आहे. अन्य फीचर्स बाबत सांगायचच झाल्यास, यामध्ये इमेज क्लिपर, एडिट सजेशन्स आणि सर्कल-टू-सर्च सारख्या एआय आधारित फीचर्सचा समावेश आहे, ज्यामुळे ज्यामुळे यूजर्सना स्मार्ट फोटो एडिटिंग आणि सर्च अनुभव मिळतो.
किंमत किती?
भारतात गॅलेक्सी एम३६ ५जीची सुरुवातीची किंमत २२,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ऑरेंज हेझ, सेरेन ग्रीन आणि वेल्वेट ब्लॅक रंगांमध्ये उपलब्ध असेल आणि १२ जुलैपासून अमेझॉन आणि सॅमसंग स्टोअर्सवर त्याची विक्री सुरू होईल.




