हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकप्रिय मोबाईल निर्माता कंपनी Samsung ने भारतीय बाजारात Samsung Galaxy M55s 5G नावाचा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. 12GB रॅम, 50MP कॅमेरा सह या मोबाईल मध्ये अनेक खास फीचर्स देण्यात आले आहेत. 26 सप्टेंबरपासून हा स्मार्टफोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. आज आपण या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत याबाबत अगदी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
डिस्प्ले –
Samsung Galaxy M55s 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेला फुल HD + रिझोल्यूशन, 2400×1080 पिक्सल रिझोल्युशन आणि 1000 निट्स पीक ब्राइटनेसचा सपोर्ट मिळतो. कंपनीने स्मार्टफोन मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर बसवण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 8GB+128GB, 8GB+256GB, 12GB+256GB स्टोरेज व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. सॅमसंगचा हा मोबाईल Android 14 वर आधारित OneUI 6.1 या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो.
कॅमेरा – Samsung Galaxy M55s 5G
मोबाईलच्या कॅमेराबाबत सांगायचं झाल्यास, Samsung Galaxy M55s 5G मध्ये ट्रिपल कॅमेरा सिस्टीम देण्यात आली आहे. यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड अँगल आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळतोय. तर सेल्फी आणि विडिओ कॉल साठी समोरील बाजूला 50MP चा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. पॉवरसाठी मोबाईल मध्ये 5000mAh बॅटरी बसवण्यात आली असून हि बॅटरी 45W वायर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. अन्य फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास, यामध्ये ड्युअल सिम सपोर्ट, वायफाय 6, ब्लूटूथ 5.2 सपोर्ट आहे. हा मोबाइल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर यांसारखे फीचर्स मिळतात.
किंमत किती?
Samsung Galaxy M55s 5G ची सुरुवातीची किंमत 19,999 रुपये आहे. या किमतीत 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंटचा मोबाईल मिळतो. हा मोबाईल काळया आणि हिरव्या रंगात लाँच करण्यात आला आहे. Amazon, Samsung.in आणि Samsung Exclusive Stores वर येत्या 26 सप्टेंबरपासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असेल. SBI क्रेडिट कार्ड वर ग्राहकांना 2,000 रुपयांची झटपट सूट मिळतेय.