Samsung Holi Sale 2024 : आजपासून सुरु झाला Samsung चा Holi Sale; या वस्तूंवर बंपर डिस्काउंट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Samsung Holi Sale 2024 : प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक ब्रँड Samsung ने होळीनिमित्त Samsung Holi Sale 2024 आणला आहे. आज म्हणजे १५ मार्चपासून हा सेल सुरु झाला असून तो २६ मार्च पर्यंत ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. सॅमसंगच्या या सेलमध्ये मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही यांसारख्या अनेक वस्तूंवर बम्पर ऑफर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे काय खरेदी करू अन काय नको असं ग्राहकांना होईल….. चला या सेलबाबत सविस्तर जाणून घेऊयात..

तुम्ही जर नवा स्मार्ट टीव्ही खरेदी करणार असाल तर Samsung Holi Sale 2024 तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरेल. कारण दुकानात जाऊन टीव्ही खरेदी करण्यापेक्षा किती तरी कमी पैशात तुम्ही या सेलमधून टीव्ही घरी घेऊन जाऊ शकता. सॅमसंग टीव्हीच्या प्रीमियम आणि लाइफस्टाइल मॉडेल्सवर 48% पर्यंत सूट देत आहे. तसेच ग्राहकांना 15,250 रुपयांपर्यंतचे अतिरिक्त एक्सचेंज फायदे सुद्धा मिळतील.

मोबाईलवर 60% पर्यंत सूट – Samsung Holi Sale 2024

सध्या मोबाईल खरेदीच फॅड जोरात सुरु आहे. मोबाईल हा आजच्या युगात जीवनावश्यक वस्तू बनला आहे. अनेकजण सातत्याने नवनवीन स्मार्टफोन खरेदी करत असतात. तुम्ही सुद्धा नवा मोबाईल घेण्याच्या विचारात असाल तर सॅमसंग होळी सेल मध्ये तुम्हाला Galaxy S सिरीज, Galaxy A सिरीजआणि Galaxy Z सिरीज अंतर्गत येणाऱ्या निवडक मॉडेलवर 60% पर्यंत बम्पर डिस्काउंट मिळेल. तसेच सॅमसंगचा टॅबलेट खरेदी केल्यास त्यावर ग्राहकांना 55% पर्यंत सूट मिळतेय.

घरगुती डिजिटल उपकरण खरेदीवर सुद्धा मोठी बम्पर ऑफर ठेवण्यात आली आहे. त्यानुसार सॅमसंग रेफ्रिजरेटर्स 49% पर्यंत सूट आणि 15,125 रुपयांपर्यंतएक्सचेन्ज बोनसचा लाभ मिळेल. तसेच विंडफ्री एसीच्या काही मॉडेल्सवर 39% पर्यंत सूट देण्यात येत आहे. जर तुम्ही एकदम २ किंवा त्यापेक्षा जास्त एसी खरेदी केल्यास आणखी ५ टक्के डिस्काउंटचा लाभ ग्राहकांना मिळेल.