Sandalwood Cultivation : चंदनाची शेती ठरतेय फायदेशीर; कमी गुंतवणुकीतून कमवा लाखो रुपये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Sandalwood Cultivation । आजच्या महागाईच्या काळात जास्त कमाई करणे खूप गरजेच झालं आहे. प्रत्येकजण जास्त पैसे मिळावेत यासाठी विविध व्यवसाय करून , जास्तीत जास्त नफा कमवत आहेत. जर तुमच्याकडे शेती असेल तर तुम्ही शेतीच्या माध्यमातून सुद्धा अनेक व्यवसाय सुरु करू शकता. तुम्हाला मोठी कमाई करायची असेल तर चंदन शेती हा उत्तम पर्याय ठरू शकतो. चंदनाची लाकडे ही जगातील सर्वात महागड्या लाकडांपैकी एक मानली जातात आणि याला देश विदेशात मोठी मागणी आहे. त्यामुळे हा व्यवसाय सुरु करून तुम्ही लाखो रुपये मिळवू शकता.

चंदनाची लागवड –

चंदनाची लागवड (Sandalwood Cultivation) दोन पद्धतींनी करता येते. एक म्हणजे सेंद्रिय शेती आणि पारंपरिक शेती होय . सेंद्रिय पद्धतीत झाडे 10-15 वर्षांत तयार होतात, तर पारंपरिक पद्धतीत 20-25 वर्षे लागतात. चंदनाच्या झाडांना सुरुवातीचे आठ वर्ष कोणत्याही बाहेरच्या सुरक्षेची आवश्यकता नसते. पण नंतर झाडांमध्ये सुगंध येऊ लागतो, त्यामुळे चोरी होण्याचा धोका वाढतो. यासाठी झाडे तयार होईपर्यंत ती प्राण्यांपासून आणि अन्य लोकांपासून सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. तसेच चंदनाची लागवड रेती आणि बर्फाळ भाग वगळता इतर ठिकाणी सहज करता येते.

चंदन शेती फायदेशीर पर्याय – Sandalwood Cultivation

आज अनेक ठिकाणी चंदनाचा वापर मोठ्याप्रमाणात होत असून , त्यामध्ये परफ्युम, सौंदर्यप्रसाधने, आणि आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी चंदन मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. 2017 मध्ये सरकारने चंदन लाकडाच्या खरेदी आणि विक्रीवर काही निर्बंध घातले आहेत. तुम्ही चंदन लावू शकता, पण त्याची विक्री फक्त सरकारलाच करता येते. या कायद्याचे पालन न केल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. चंदन शेती हा एक फायदेशीर पर्याय असून, नियमांचे पालन करून तुम्ही लाखोंची कमाई करू शकता

किती कमाई होईल –

तुम्हाला एका चंदनाच्या झाडापासून सुमारे 5 लाख रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते. जर तुम्ही 100 झाडे लावलीत, तर ती तयार झाल्यावर त्यांची किंमत 5 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. चंदनाचे रोपे 100-150 रुपयांत उपलब्ध आहेत. बाजारात चंदनाची किंमत सुमारे 30000 रुपये प्रति किलो आहे. हि लाकडे महाग असली तरी लोकांची मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुमच्यासाठी चंदनाच्या झाडाचा व्यवसाय सुरु करणे जास्त फायदेशीर ठरू शकते.