संपलेल्या पक्षावर बोलत नाही म्हणणाऱ्यांच नाव ही संपलं; मनसेने उद्धव ठाकरेंना डिवचलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अंधेरी पोटनिवडणुकीपूर्वीच निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. तसेच या निवडणुकीसाठी शिवसेना हे नावही आता वापरता येणार नाही. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरेंना डिवचलं आहे. संपलेल्या पक्षावर बोलत नाही म्हणणाऱ्यांच नाव ही संपलं असा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाही म्हणणाऱ्यांचा नाव ही संपलं आणि चिन्ह ही कालाय तस्मै नमः । असं म्हणत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांच्या कडे मोठा गुण आहे जो कुठल्याच ठाकरेंकडे नाही तो म्हणजे गरीब,भोळा चेहरा करून आपल्यावर कसा अन्याय झाला हे सांगणे त्या चेहऱ्याच्या आड आपण आधी करून ठेवलेली लबाडी लपवण्याचं सामर्थ्य आहे ज्याला इंग्रजी मध्ये victim कार्ड अस म्हणतात जे या पुढे सातत्याने बघायला मिळेल असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेचा बाण सोडला.

दरम्यान, निवडणूक आयोगानं शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह तात्पुरतं गोठवलं आहे. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीसाठी दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. ठाकरे आणि शिंदे या दोघांनाही सोमवारपर्यंत नव्या चिन्हासाठी पर्याय द्यावा लागणार आहे. दोन्ही गटांना 3 चिन्हांची निवड करून ती निवडणूक आयोगाकडे सादर करावी लागणार आहेत.