सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाबाधित रुग्णांचे रेकॉर्डब्रेक झाले असून चोवीस तासात तब्बल 339 रुग्ण बाधित आढळून आले. बाधित रुग्णांपैकी सहा जणांचा मृत्यू झाला तर उपचारानंतर 95 जण कोरोनामुक्त झाले. सांगलीतील 70 वर्षीय महिला, मिरजेतील 70 वर्षीय पुरुष, कर्नाळमधील 86 वर्षाचा वृद्ध, भोसेतील 75 वर्षीय महिला, वासुंबेतील 62 वर्षीय पुरुष व खटाव येथील 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मिरज तालुक्यात सर्वाधिक 23, कवठेमहांकाळमध्ये पंधरा, पलूस अठरा, आटपाडी सहा, शिराळा पाच, खानापूर तीन, वाळवा व कडेगाव प्रत्येकी दोन आणि तासगाव तालुक्यात एक रुग्ण आढळला.
मागील काही दिवंसापासून रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात नव्या रुग्णांची संख्या वाढत असताना शुक्रवारी आणखी सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सांगलीतील 70 वर्षीय महिलेवर घाटगे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते, उपचारावेळी त्या महिलेचा मृत्यू झाला. भोसतील 75 वर्षीय महिलेवर वानलेस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते, याशिवाय मिरजेतील 70 वर्षीय पुरुष, कर्नाळमधील 86 वर्षीय वृद्ध, पलूस तालुक्यातील खटावमधील 60 वर्षीय महिला तसेच तासगाव तालुक्यातील वासुंबे येथील 62 वर्षीय पुरुषावर मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. या चारही जणांच्या प्रकृतीत अधिक बिघाड झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या बळींची संख्या 78 झाली आहे. सांगली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर पहायला मिळाला. महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर रेकॉर्डब्रेक झालेला पहायला मिळाला. आज तब्बल 254 जण पॉझिटिव्ह आले आहे. आज मोठ्याप्रमाणावर रुग्ण आढळल्याने सांगली हादरून गेली आहे.
दिवसभरात 204 नवे तर अँटिजेंन टेस्टमध्ये 43 तर खाजगी लॅबमध्ये सात असे ऐकून 254 पॉझिटिव्ह सापडले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवकासह महापालिकेच्या महिला डॉक्टराचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी नव्याने सापडलेल्या रुग्णाच्या परिसरात औषध फवारणीसह अन्य खबरदारीच्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना केल्या आहेत.मिरज तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून शुक्रवारी 23 रुग्ण आढळून आले. समडोळीमध्ये बाधिताच्या संपर्कातील आठ जण, अंकलीमध्ये सहा, आरगला दोन तर तुंग, कसबे डिग्रज, लिंगनूर, नरवाड, माधवनगर, बुधगाव आणि कवलापूरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. कडेगाव तालुक्यातील आसद व कडेगाव मध्ये एक रुग्ण, पलूस तालुक्यातील भिलवडीमध्ये पाच, खटाव व कुंडल मध्ये प्रत्येकी दोन, ब्रह्मनाळ, खंडोबाचीवाडी येथे प्रत्येकी एक रुग्ण, जत तालुक्यातील लोहगावमध्ये तीन, जत शहर व शेगाव येथे प्रत्येकी दोन, सोन्याळ, उटगी व निगडी येथे प्रत्येकी एक रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगावमध्ये आठ व कवठेमहांकाळ शहरात सात रुग्ण आढळून आले.
शिराळा तालुक्यातील कोकरूडमध्ये तीन, शिराळा शहरात व निगडी येथे प्रत्येकी एक, खानापूर तालुक्यातील चिखलहोळ, मंगरूळ आणि विटा शहरात प्रत्येकी एक रुग्ण, आटपाडी तालुक्यातील आटपाडी शहरात 5 व कामतमध्ये एक, तासगाव शहरात एक, वाळवा तालुक्यातील आष्टा व मसुचीवाडीमध्ये प्रत्येकी एकआढळून आला. याशिवाय बेळगाव येथील 2,कोल्हापूर जिल्ह्यातील तीन, रत्नागिरी येथील एक, सोलापूरमधील एक व सातारा जिल्ह्यातील दोन रुग्ण आढळून आले.या रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 2643 रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी 78 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 1128 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1437 कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.