भुजबळांना कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून बाहेर काढा; शिंदे गटाच्या आमदाराच वादग्रस्त वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यामुळे सध्या राज्यभरात जल्लोष साजरा केला जात आहे. मात्र दुसऱ्या बाजूला ओबीसी नेत्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आक्रमकाचा पवित्रा घेतला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत मराठा आरक्षणाला विरोध दर्शवल्यामुळे त्यांच्यावर करण्यात येत आहे. अशातच आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी छगन भुजबळांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

सध्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड छगन भुजबळ यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. त्यांनी भुजबळ यांना मंत्रिमंडळातून काढण्याची मागणी केली. त्याचबरोबर, “छगन भुजबळ यांच्या कमरेत लाथ घाला आणि त्यांचे सरकारमधून हकालपट्टी करा” असे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. आता संजय गायकवाड यांनी केलेल्या या वक्तव्यावर छगन भुजबळ काय प्रतिक्रिया देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भुजबळांना कमरेत लाथ घालून….

छगन भुजबळ यांच्या विरोधात बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, “एका राज्याच्या मंत्र्याची भूमिका ही कोणत्याही एका समाजाच्या विरोधात असू शकत नाही, असे असेल तर तो मंत्री पदावर राहायच्या लायकीचा नाही. भुजबळ सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना विरोध करत मराठा समाजाच्या विरोधात जर भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की, भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा. आता कुणाचा बापही मराठा आरक्षण रोखू शकणार नाही”

दरम्यान, राज्य सरकार मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देत असल्यामुळे याला ओबीसी समाजाने आणि ओबीसी नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शवत छगन भुजबळ यांनी एल्गार यात्रेची घोषणा केली आहे. तसेच सगेसोयरे मसुद्याविरोधात हरकती नोंदवण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. त्यामुळेच छगन भुजबळ यांच्यावर मराठा नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे.