आता ‘या’ योजनेचे पैसेही थेट खात्यात जमा होणार; मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

scheme news

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राज्य सरकार विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक मदत करत आहे. यामध्ये, महिलांसाठी सर्वाधिक योजना राबवल्या जात आहेत. सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला १५०० रुपये थेट लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा केले जात आहेत. त्यामुळे महिलांना या योजनेसाठी सर्वाधिक फायदा होत आहे. (Government Scheme)

राज्यात ही योजना सुरू असतानाच सरकारने आणखीन एका योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय गांधी निराधार योजना (Sanjay Gandhi Niradhar Yojana) आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनांचा अधिकाधिक लाभ नागरिकांना मिळावा यासाठी अटी व शर्तींमध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच, शासकीय वसतीगृहांच्या दुरुस्तीच्या कामांना गती देऊन विद्यार्थ्यांसाठी सर्व सोई-सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश देखील फडणवीस यांच्याकडून देण्यात आले आहेत. यासह, वसतीगृहाची प्रवेश प्रक्रिया आणि जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाइन करण्यात यावी असेही त्यांनी सांगितले आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.

दरम्यान, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी स्वतंत्र पोर्टल सुरू करण्याची सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. यासह विभागांतर्गत सर्व महामंडळांसाठी एक एसओपी तयार करण्याचे निर्देश त्यांच्याकडून देण्यात आले आहेत. यामुळे आधार कार्ड थेट बँक खात्याशी लिंक असलेल्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.