संजय राऊतांना ED कडून अटक; आज कोर्टात हजर करणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर ईडी ने अटक केली आहे. मुंबईतील पत्राचाळ प्रकरणी चौकशी साठी ईडी ने त्यांना ताब्यात घेतले होते. अखेर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली आहे. राऊतांच्या अटकेमुळे शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या साठी मोठा झटका मानला जात आहे.

संजय राऊत याना काल दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ईडीने ताब्यात घेतले होते. त्यानंतर सव्वा सहा वाजण्याच्या दरम्यान 11 लाख 50 हजार रूपयांची रोकड संजय राऊतांच्या घरातून जप्त करण्यात आली. त्यानंतर रात्री १२ नंतर संजय राऊतांना अटक करण्यात आली आहे. आज त्यांना कोर्टात हजर केले जाईल. राऊतांना जामिन मिळतो की कोठडी याकडे लक्ष आता लागले आहे.

दरम्यान, संजय राऊत यांच्या अटकेनंतर त्यांचे बंधू आणि शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पार्टी संजय राऊतांना घाबरली. संजय राऊतांना बोगस केस बनवून अटक करण्यात आली आहे. आम्ही न्यायायलात नक्कीच लढा देऊ. आम्ही नक्कीच या विरोधात आवाज उठवू असे ते म्हणाले.