Tuesday, February 7, 2023

संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले की…

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत याना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जामीन मिळाला आहे. यांनतर आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक वर जाऊन भेट घेतली. तत्पूर्वीच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती.

पवारांना भेटल्यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आज ३ महिन्यांनी मी पवार साहेबाना भेटलो. पण साहेब सतत माझ्या कुटुंबीयांची काळजी घेत होते. सुनीलशी चर्चा करत होते, वकीलांशी बोलत होते. मी जेलमध्ये असतानाच साहेबांची तब्ब्येत बिघडली. त्यांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्यात आलं होत. आता हळू हळू त्यांची तब्ब्येत सुधारत आहे अशी माहिती संजय राऊतांनी सांगितली.

- Advertisement -

यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेबाबतही भाष्य केलं. भारत जोडो यात्रा हे एक आंदोलन आहे. राष्ट्रीय एकता, एकात्मता, सर्व समाज, प्रांत, धर्म पंत यांना जोडण्याचा विचार आहे. या देशातील द्वेष भावना, कटुता नष्ट करण्यासाठी ही यात्रा आहे. या यात्रेच स्वागत भाजपनेही केलं पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हंटल.