INDIA आघाडीकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण ? राऊतांनी ठाकरेंसह सांगितली ‘ही’ 4 नावे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी लोकसभा निवडणूक अगदी तोंडावर आली असून सर्वच पक्ष व्युव्हरचना आखत नाही. भाजप प्रणित NDA आघाडीला रोखण्यासाठी देशभरातील विरोधकांनी INDIA आघाडी स्थापन केली आहे. मात्र INDIA कडे पंतप्रधान पदासाठी उमेदवारच नाही अशी टीका सत्ताधारी भाजपचे नेते सातत्याने करत असतात. काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आमच्याकडे नरेंद्र मोदींसारखा कणखर नेता आहे, विरोधकांकडे पर्यायच नाही अशी टीका केली होती. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सणसणीत उत्तर देत INDIA आघाडीकडून पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण असू शकतो याबाबत काही नावेही जाहीर केली.

आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, NDA कडे गेल्या 10 वर्षांपासून पंतप्रधान पदासाठी एकच चेहरा आहे. पण आमच्याकडे बरेच पर्याय आहेत. मग यामध्ये राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियांका गांधी (Priyanka Gandhi), मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील कुणीही पंतप्रधान होऊ शकतं. 2024 मध्ये जेव्हा देशात इंडिया आघाडीची सत्ता येईल तेव्हा या 4 नेत्यांपैकी कोणीहीपंतप्रधान होऊ शकत असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला.

राम मंदिरावरून सुद्धा राऊतांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपनं नरेंद्र मोदींना भगवान विष्णुचा तेरावा अवतार घोषित केल आहे. रामाचा हात धरून ते त्यांना मंदिरात बसवणार आहेत असे ऐकले आहे. मंदिरात जाणारा हा भक्त असतो, पण या देशात मंदिरात जाणारा एकमेव VIP म्हणजे नरेंद्र मोदी आहेत. अशी खोचक टीका संजय राऊतांनी मोदींवर केली आहे.

बाबरी पाडण्यात आली त्यावेळी हे सर्वजण कुठे होते?? 

तसेच जेव्हा बाबरी पाडण्यात आली त्यावेळी हे सर्वजण कुठे होते असा सवालही संजय राऊत यांनी केला. बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा पुढे येऊन जबाबदारी घेतली. बाबरीचं घुमट कोसळताच जे पळून गेले, हे आमचं काम नाही म्हणारे आता छाताडाची भाषा करत आहे. तेव्हा कुठे होती छाताडं? असा सवाल करत संजय राऊतांनी भाजपवर जोरदार घणाघात केला आहे.