सीमावादाचे सर्वाधिक चटके शहांची सासरवाडी असलेल्या कोल्हापूरला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचे सर्वात जास्त चटके केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सासुरवाडी असलेल्या कोल्हापूरला बसतात असा उपरोधिक टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. आज सीमाप्रश्नी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासोबत अमित शाह चर्चा करणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, मित शाह यांना भेटून काही फायदा नाही, असे बोम्मई म्हणत आहेत, पण आम्ही म्हणतो, अमित शाहांना भेटून फायदा आहे. कारण सीमाभाग केंद्रशासित करण्याचा निर्णय झाल्यास केंद्रीय गृह मंत्रालयाचा निर्णय घेत असते. सीमाभागात मागील ७० वर्षांपासून मराठी माणसाचा छळ सुरु आहे. अमित शाह यांची सासरवाडी असलेल्या कोल्हापूरला त्याचा सर्वाधिक फटका बसतो असेही ते म्हणाले.

न्यायालय राम मंदिराची सलग सुनावणी करून प्रश्न सोडवू शकतो, पण 20 ते 25 लाख मराठी भाषिकांच्या प्रश्नावर मात्र तारखेवर तारीख मिळत आहे. फक्त सीमाभागाचा विषय नाही तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगतायेत. त्यामुळे आजच्या बैठकीतून काही चांगल निघणार असेल, तर आम्ही स्वागत करतो असंही राऊतांनी सांगितले.