50 खोकेवाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत.? राज्यपालांच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोषारी यांनी केल्यानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकामागून एक ट्विट करत राज्यपालांसह शिंदे गटावर निशाणा साधला आहे. हा महाराष्ट्राचा घोर अपमान असून 50 खोके वाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत.. असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.

महाराष्ट्रात भाजपा पुरस्कृत मुख्यमंत्री होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला..स्वाभिमान अभिमान यावर बाहेर पडलेला गट हे ऐकूनही गप्प बसणार असेल तर शिवसेनेचे नाव घेऊ नका..मुख्यमंत्री शिंदे..राज्यपालांचा साधा निषेध तरी करा.मराठी कष्टकरी जनतेचा हा अपमान आहे. काय ती झाडी.. काय तो डोंगर.. काय नदी.. आणि आता… काय हा मराठी माणूस .. महाराष्ट्राचा घोर अपमान! 50 खोके वाले आता कोणत्या झाडी डोंगरात लपून बसलेत.. असं म्हणत संजय राऊत यांनी राज्यपालांसह शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडाआहे.. 105 मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता.. मुख्यमंत्री शिंदे …ऐकताय ना. की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे.. स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा.. दिल्ली पुढे किती झुकताय? आता तरी.. ऊठ मराठ्या ऊठ.. शिवसेना फोडून बुळबुळीत सरकार का आणले याचा खुलासा भाजपा राज्यपालांनी केला आहे.. बुळबुळीत गटाचे लोक उठणार नाहीत.. मराठ्या तुलाच उठावे लागेल.

राज्यपाल नेमकं काय म्हणाले-

मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. यावेळी आपल्या भाषणात राज्यपाल म्हणाले, कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, असेही भगसिंह कोश्यारींनी म्हंटल.