नारायण राणे पादरा पावटा, पुढे काही बोललास तर नागडा करेन; राऊतांची जहरी टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नारायण राणे (Narayan Rane) पादरा पावटा आहे, त्याला सांगा माझ्या नादाला लागू नको, नाहीतर तुला नागडं करेन असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. राणे यांनी नुकतंच संजय राऊतांना सामना अग्रलेखावरून पुन्हा एकदा तुरुंगाचा इशारा दिला होता, त्याबाबत विचारलं असता संजय राऊतांनी राणेंवर कडक शब्दात तोंडसुख घेतलं.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, बाळासाहेबांच्या भाषेत सांगायचं झाल्यास नारायण राणे हा पादरा पावटा आहे. आत्तापर्यंत मी शांत होतो पण आता त्याने त्याची मर्यादा ओलांडली आहे. हा माणूस स्वतःला कोण समजतो. याला अरेतुरे कर, त्याला अरेतुरे कर… यापूर्वी उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी, अहमद पटेल. सोनिया गांधी याना अरेतुरे करत होता. आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना अरेतुरे करतोय.. पण तुम्ही कोण आहात ? तुम्ही डरपोक आहात म्हणून पळून गेला अशी टीका संजय राऊतांनी केली.

तुमच्या १०० बोगस कंपन्या मी आता बाहेर काढतो. नारायण राणे, माझ्या नादाला लागू नकोस. तुझ्यासारखे ५६ आले आणि ५६ गेले, तू नामर्द माणूस आहेस. ईडी सीबीआयला घाबरून तू पळून गेलास. तुझी लायकी आहे का? असा संताप राऊतांनी व्यक्त केला. यापुढे सुद्धा नारायण राणे असच पुढे बोलत राहिला तर त्याला पूर्ण नागडा करेन अशा एकेरी शब्दात राऊतांनी राणेंवर हल्लाबोल केला.