शिवसेना काय तुमच्या बापाची आहे का? राऊतांची निवडणूक आयोगावर खालच्या भाषेत टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून आपल्या वेगवेगळ्या विधानांनी चर्चेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आता थेट निवडणूक आयोगावरच (Election Commission) खालच्या भाषेत निशाणा साधला आहे. संजय राऊत आज सांगली जिल्ह्यात होते. यावेळी एका जाहीर सभेत बोलताना त्यांनी शिंदे गट आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला. शिवसेना काय तुमच्या बापाची आहे का ? असं म्हणत त्यांनी थेट निवडणूक आयोगावरच टीका केली.

संजय राऊत म्हणाले, संघर्ष करणारा हा शिवसैनिक आहे. शिवसैनिकांनी उपाशी राहुन घरची चटणी-भाकर खाऊन तुम्हाला आमदार-खासदार, मंत्री केलं आहे. शिवसैनिक इथेच आहेत आणि तुम्ही ज्यांना निवडून दिलं ते 50 खोके घेऊन पळून गेले आहेत. आणि निवडणूक आयोग सांगतोय शिवसेना त्यांची आहे, तुमच्या बापाची आहे का भो***? ही शिवसेना निवडणूक आयोगाने निर्माण केली का? असं संजय यांनी म्हंटल.

निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे यांच्या घशात घातली. पण, शिवसेनेची ताकद कोणाच्या दावणीला लागणार नाही. 50 खोक्यांच्या एवढ्या घोषणा झाल्या की संपूर्ण जगात पोहचलं आहे असं संजय राऊत म्हणाले. ज्यांनी शिवसेना सोडली त्यांना आणि भारतीय जनता पक्षाला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. भाजपने आमच्या पाठीत खंजीर खूपसले. तयामुळे हे भांडण फक्त 40 चोरांशी नाही, तर भाजपशीही आहे, असा कडक इशारा संजय राऊतांनी दिला