Wednesday, March 22, 2023

संजय राऊत होणार भारत जोडो यात्रेत सहभागी; घेणार राहुल गांधींची भेट

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तब्बल 103 दिवस तुरुंगात राहून परतल्यानंतर खासदार संजय राऊत काल पहिल्यांदाच दिल्लीला गेले. राज्यसभेमध्ये खासदार असलेल्या संजय राऊत यांचे सफदरजंग लेन येथील त्यांच्या निवासस्थानी दिल्लीतील शिवसेना कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी राऊतांनी मध्यप्रदेश किंवा काश्मीरमध्येच समारोपादरम्यान आपण भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले.

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वा. सावरकर यांच्याविषयी एक वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर राज्यातले राजकारण चांगळेच तापले होते.दरम्यान राऊतांनीही राऊळ गांधी यांच्या वक्तव्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होणार असल्याचे म्हंटले होते. त्यानंतर राऊत यांनी तुरुंगवासातून मुक्ततेनंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी फोन करून विचारपूस केली. सोबतच, भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्याचाही मानस त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

- Advertisement -

महाराष्ट्रानंतर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आता मध्यप्रदेशात जाणार आहे. तर राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांनंतर अखेर काश्मीरमध्ये श्रीनगरमध्ये यात्रेचा समारोप होणार आहे. यावेळी शिवसेनेची तोफ संजय राऊत राहुल गांधी यांच्यासोबत दिसणार आहे.