संजय राऊत राष्ट्रवादीत जाणार, बैठकाही झाल्या; नव्या दाव्याने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार आहेत, १० जूनला राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी किंवा त्याच्या आधीच ते राष्ट्रवादीत जातील असा खळबळजनल दावा भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. संजय राऊत हे ना बाळासाहेबांचे झाले, ना ते उद्धव ठाकरेंचे होणार असेही नितेश राणे यांनी म्हंटल मुंबई येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संजय राऊत हे राष्ट्रवादीत जाणार असून त्यांच्या बैठकाही झाल्या आहेत, बोलणी सुरु आहे. पवार साहेबांच्या राजीनाम्यावरून तुम्ही संजय राऊत यांची भूमिका बघितल्या किंवा त्याच्या आधीपासून भूमिका बघितली तर संजय राऊतांनी सातत्यानं अजित पवारांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. अजितदादांवर टीका करत आलेले आहेत. याचे कारण हेच आहे कि राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची त्यांची अटच आहे की अजित पवारांनी पक्ष सोडला की मी लगेच पक्षप्रवेश करतो असा मोठा दावा नितेश राणी यांनी केला.

महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांवर टीका करणारा एकमेव माणूस म्हणजे संजय राऊत आहे. उद्धव ठाकरेंच आता काही खरं नाही, त्यांच्याकडे स्वतःचा पक्ष नाही. मला उद्धव ठाकरे आता खासदार करू शकत नाही. म्हणून आता ठाकरेंकडे राहण्यात मला रस राहिला नाही. म्हणून तुम्ही माझा राष्ट्रवादीत प्रवेश करून घ्या असं संजय राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सांगितल्याचा खळबळजनक दावाही नितेश राणे यांनी केला आहे.