संजय राऊतांचं विधीमंडळाबाबत वादग्रस्त विधान; म्हणाले की…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसरा दिवशी विरोधक राज्यातील शेती, महागाईच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले असताना आज ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात विधीमंडळाबाबत वादग्रस्त विधान केले. त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले आहेत.

संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर ‘चोर’ मंडळ आहे. गद्दार गेल्यानंतर संघटन मजबूत होत आहे. कसबा, चिंचवडच्या पोटनिवडणुकीत यंत्रणांचा गैरवापर झाला आहे. कायदा आणि पोलीस कोणाच्या मर्जीने नाचत आहेत? 2024 ला सगळ्यांचा हिशेब देऊ.

“आम्हाला बाळासाहेबांनी पदे दिली आहेत, त्यामुळे त्यांनी पदावरुन काढलं, तरी आम्ही अशी पदे ओवाळून टाकतो. डुप्लिकेट शिवसेनेचं हे विधीमंडळ नसून चोरमंडळ आहे. जे लोकं सरकार विरोधात बोलतात, त्यांना तुरुंगात टाकायचं. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे. त्यांची बदनामी करायची, एवढेच उद्योग सध्या सुरू आहे. पण आताच्या सत्ताधाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं, की २०२४ मध्ये सगळ्यांचा हिशोब केला जाईल,” अशा इशारा राऊत यांनी राज्य सरकारला दिला.