Tuesday, January 31, 2023

राऊतांना झालेली अटक बेकायदशीर; कोर्टाची ED ला चपराक

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत याना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. राऊतांच्या आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली त्यावेळी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. यावेळी कोर्टाने ईडी वर ताशेरे ओढले आहेत. संजय राऊत याना केलेली अटक बेकायदेशीर आहे अशा शब्दात ईडीला चपराक लगावली आहे.

ईडीने केलेली अटक बेकायदेशीर आहे. ईडीने स्वतःच्या मर्जीने आरोपी निवडले. ईडीने मुख्य आरोपीना हात का घातला नाही? असा सवालPMLA कोर्टाने केला आहे. प्रवीण राऊत यांना फक्त दिवाणी खटल्यात अटक करण्यात आली तर संजय राऊत यांना काहीही कारण नसताना अटक केली. मुख्य आरोपी राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि या घोटाळ्यातील सरकारी अधिकारी यांच्यावर कारवाई का झाली नाही, असा प्रश्न कोर्टाने उपस्थित करत ईडीच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

- Advertisement -

दरम्यान, रात्री ७ वाजता संजय राऊत हे ऑर्थर रॉड तुरुंगातुन बाहेर येतील. संजय राऊत यांच्या सुटकेमुळे शिवसैनिकांच्या अंगात नवा जोश आणि उत्साह आला आहे. ऑर्थर रोड जेलच्या बाहेर राऊतांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. तुरुंगातून बाहेर आल्यांनतर संजय राऊत सिद्धिविनायकचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर संजय राऊत स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला सुद्धा भेट देतील. नंतर ते मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतील आणि मग स्वतःच्या घरी जातील.