संजय राऊत यांच्या जामीनावर आज फैसला; काय होणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सध्या अटकेत असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान आज न्यायालयाकडून नेमका काय निर्णय दिला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय राऊत यांच्याबाबत केलेल्या जमीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने मागील पार पडलेल्या सुनावणीवेळी निर्णय राखून ठेवला होता. या निर्णयावर आज सुनावणी घेतली जाणार आहे. आज न्यायालयाकडून आपला अंतिम निर्णय दिला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईतील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी खासदार संजय राऊत आणि प्रविण राऊत दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज एकाच दिवशी निकाल देण्यात येणार आहे. न्यायालयाकडून काय निकाल दिला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

संजय राऊतांवर आरोप काय?

सध्या अटकेत असलेले खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आरोप करत 31 जुलै रोजी ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांना प्रथम ईडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तेव्हापासून राऊत आर्थर रोड कारागृहात आहेत. संजय राऊत यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले होते. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. याच पैशातून अलिबाग येथे जमीन खरेदी करण्यात आली होती. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती, ते प्रविण राऊत हे फक्त नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊतच आहेत, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.