ICC T20 World Cup 2024 : पंत- राहुल नव्हे, तर संजू सॅमसन T-20 वर्ल्डकपसाठी पहिली पसंत??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या 1 जूनपासून आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 चा (ICC T20 World Cup 2024) थरार रंगणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची निवड येत्या १-२ दिवसात होऊ शकते. भारतीय संघात काही दिग्गज खेळाडूंची निवड जवळपास फिक्स आहे. तर काही नवे चेहरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतात. मीडिया रिपोर्टनुसार विकेटकिपरसाठी संजू सॅमसनचे (Sanju Samson) नाव आघाडीवर आहे. सध्या सुरु असलेल्या आयपीएल मध्ये संजू राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करत असून बॅटिंग मध्येही तो तुफान फॉर्मात आहे. त्याचमुळे संजू सॅमसनचे नाव आघाडीवर दिसत आहे.

खरं तर विकेटकिपरसाठी रिषभ पंत किंवा केएल राहुल यांची निवड होईल असं सुरुवातीला वाटलं होते. परंतु आता या दोघांपेक्षा संजू सॅमसन हा निवड समितीसाठी पहिली पसंत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. संजू सॅमसन हा विकेटकिपर जरी असला तरी वेळप्रसंगी सलामीला खेळण्याची आणि फिरकीपटूंनवर हल्ला करण्याची क्षमता संजूकडे आहे. त्यातच सध्या तो ज्या स्ट्राईक रेटने आणि नियमितपणे धावा काढत आहे ते पाहता त्याची निवड जवळपास नक्की मनाली जात आहे. संजू सॅमसनची निवड झाल्यास रिषभ पंत किंवा लोकेश राहुल यांच्यातील एकाला बाहेर बसावं लागेल असेही बोललं जात आहे.

दरम्यान, यंदाच्या आयपीएल स्पर्धेत संजू सॅमसन तुफान फॉर्मात आहे. राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करत असलेल्या संजूने फलंदाजी आणि नेतृत्वगुण या दोन्हीमध्ये चांगलीच छाप सोडली आहे. संजूने आत्तापर्यंत 9 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 385 धावा केल्या आहेत. यंदाच्या आयपीएल मध्ये सर्वाधिक धावा बनवण्याच्या यादीत संजू सॅमसन चौथ्या क्रमांकावर आहे. संजू सॅमसन अतिशय निडरपणे गोलंदाजांवर हल्ला करत आहे. एवढच नव्हे तर संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने आत्तापर्यंत एकूण ९ सामन्यात ८ विजय मिळवले आहेत.