संतोष देशमुखांना का मारलं? चाटे अन् केदारनं घेतलं ‘कराड’चं नाव

santosh deshmukh murder case (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या (Santosh Deshmukh Murder Case) तपासात नवा ट्विस्ट आलाय. यापूर्वी पोलिसांच्या ताब्यात असलेले रोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे व महेश केदार यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येची कबुली दिली आहे. मात्र हे कबूल करता असताना तिन्ही आरोपांनी चौथ्याच व्यक्तीच नाव घेत खळबळ उडवून टाकली आहे. संतोष देशमुखला आम्ही मारलं कारण त्याने सुग्रीव कराडच ऐकून आम्हाला आवादा कंपनीच्या आवारात सरपंच संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थानी मारहाण केली होती त्याचा बदला घेण्यासाठी आम्ही संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या केल्याचं आरोपींची सांगितलं आहे. त्यामुळे सुग्रीव कराड (Sugreev Karad) आहे तरी कोण? या चर्चाना उधाण आलं आहे.

संतोष देशमुखांचं अपहरण करुन त्यांची हत्या करणारा प्रमुख आरोपी सुदर्शन घुले (Sudarshan Ghuele) यानं पोलिसांना जबाब देताना सांगितलं की, सुग्रीव कराड यानं संतोष देशमुख यांना सुदर्शन घुलेला मारहाण करण्यास सांगितलं. त्यामुळं माजी सरपंच असलेल्या देशमुखांनी आवादा कंपनीच्या वॉचमनला धमकावणाऱ्या सुदर्शन घुलेच्या कानशिलात लगावली. सर्व माणसात हा प्रकार घडल्याने आमची पुरती बदनामी झाली. या बदनामीचा बदला घेण्यासाठीच कानशिलात लगावणाऱ्या संतोष देशमुखांचं आम्ही अपहरण केलं आणि मग त्यांची निर्घृणपणे हतय केली असा जबाब तिन्ही आरोपींनी दिला.

कोण आहे सुग्रीव कराड?

सुग्रीव कराड हा केज मधील रहिवासी असून तो देखील गुंड आहे. तो याच्याआधी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याच्याबरोब काम केलं आहे. लोकसभेपर्यंत खासदार बजरंग सोनवणेंना विरोध केला होता. पण आता सुग्रीव कराड खासदारांचं नेतृत्व मान्य केल्याची चर्चा सुरू आहे. तर सुग्रीव कराड हे राजकीय पटलावरील असून ते पंचायत समितीला आईला निवडून आणले होते. केज नगरपंचायतीच्या वेळी खासदारांच्या मुलीचा पराभव केला होता. आता सुग्रीव कराडचं संतोष देशमुख हत्या प्रकरणात थेट नाव आल्यानं तो यावर काय स्पष्टीकरण देतोय, हे पाहावं लागणार आहे.