Santosh Deshmukh Murder Videos । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने आजही महाराष्ट्रातील जनता जातेय. या हत्या प्रकरणी वाल्मिक कराड आणि त्याच्या गॅन्गला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सखोल चौकशी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात संतोष देशमुख यांची हत्या किती अमानुष आणि क्रूर पद्धतीने करण्यात आली याचे फोटो व्हायरल झाले होते… आता संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे १५ व्हिडीओ समोर (Santosh Deshmukh Murder Videos) आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी महेश केदार याने संतोष देशमुखांना स्वतःच्या मोबाईलमध्ये दोन तास अमानुष मारहाण करताना तब्बल 15 व्हिडीओ आणि 8 फोटो घेतले होते. हे फोटो आणि व्हिडीओ तपासावेळी पोलिसांच्या हाती लागले असून, हे सर्व पुरावे पोलिसांनी न्यायालयासमोर सादर केले आहेत. तब्बल दोन तास सात मिनिटे आरोपी संतोष देशमुख यांना मारत होते आणि व्हिडीओही काढत होते. हे सर्व व्हिडीओ ९ डिसेंबर रोजीचे आहेत.. या व्हिडिओत नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात….
पहिला वीडियो – 9 डिसेंबर 2024 रोजी 3 वाजून 46 मिनिटांनी मारहाणीला सुरुवात केली आहे. मोबाईलमधला हा पहिला व्हिडीओ १ मिनिट १० सेकंदांचा आहे. यामध्ये आरोपी संतोष देशमुख यांना पाईप आणि वायरप्रमाणे असलेल्या हत्याराने, लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत.
दुसरा व्हिडीओ : 9 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 3.47 वाजता 53 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये देशमुखांना आरोपी शिवीगाळ करून पाईप आणि वायरने मारहाण करत आहेत. आरोपी देशमुख यांची पॅंट काढत आहेत.
तिसरा व्हिडीओ : 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ 3.38 वाजता 35 सेकंद देशमुखांना मारहाण (Santosh Deshmukh Murder Videos) सुरू असताना दुसरा आरोपी वायरसारखे हत्यार घेऊन पाठीमागे लावलेल्या मुठीने मारहाण करत आहे.
चौथा व्हिडीओ : 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ 3.51 वाजता २ मिनिट ४ सेकंद आरोपी शिवीगाळ करून पाईपने मारहाण करताना व्हिडिओ काढत आहेत. व्हिडिओ शूटिंग काढणारा महेश केदार असल्याचं दिसत आहे. याच व्हिडीओमध्ये सुदर्शन घुलेची गाडीही दिसत आहे.
पाचवा व्हिडीओ : 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ 3.52 वाजता 7 सेकंद या व्हिडीओमध्ये आरोपी संतोष देशमुखांना कॉलर धरून उठवून बसवत आहेत.
सहावा व्हिडीओ : 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ 3.53 वाजता ३६ सेकंदाच्या व्हिडीओमध्ये देशमुख यांना तोंडावर, शरीरावर मारहाण झालेली दिसत आहे.
सातवा व्हिडीओ : 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ 3.54 वाजता 14 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये देशमुखांना पाईपने मारहाण करताना मोबाईलमध्ये शूट करताना एक व्यक्तीचा हात दिसतो.
आठवा व्हिडीओ : 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ 3.54 वाजता 4 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये आरोपी संतोष देशमुखांना बळजबरीने काही तरी विचारताना दिसत आहेत.
नववा व्हिडीओ : 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ 3.55 वाजता 52 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये देशमुख यांना तोंडावर, तसेच इतर ठिकाणी मारहाण झालेली आहे. तसेच, सुदर्शन घुले सगळ्यांचा बाप आहे, असं जबरदस्ती म्हणायला लावलं जातं.
दहावा व्हिडीओ : 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ 3.58 वाजता दोन सेकंद देशमुखांना अंगावरील सर्व कपडे काढून अंडरवेअरवर बसवून पाईपने मारहाण केली व दुसरी व्यक्ती व्हिडिओ शूटिंग करत आहे.
व्हिडीओ 11 : 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ 3.58 वाजता 5 सेकंद जखमी देशमुखांना अंडरवेअरवर बसवून दुसरी व्यक्ती व्हिडिओ शूटिंग करत होता.
व्हिडीओ 12 : 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ 3.59 वाजता 12 सेकंद देशमुखांना जबरदस्तीने केस ओढून बोलायला लावून व्हिडिओ शूटिंग केलं जातं.
व्हिडीओ 13: 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ सायंकाळी 5.34 वाजता 1.44 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये देशमुखांना स्कॉर्पिओ गाडीजवळ अंडरवेअरवर झोपवल्याचे दिसते, आरोपी हे देशमुखांना रक्ताचे डाग असलेली पँट घालताना दिसतात.
व्हिडीओ 14: 9 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5.35 वाजता 1.04 सेकंद देशमुखांना उठवून बसवून शर्ट घालताना दिसत आहे. शर्ट घालण्याअगोदर फाटलेले व रक्ताने भरलेले बनियन फेकून देताना दिसत आहे.
व्हिडीओ 15 : 9 डिसेंबर 2024 रोजी वेळ सायंकाळी 5.53 वाजता 24 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती वेदनेनं कण्हत असताना आवाज येतो.