सप्तशृंगी गड घाटात भीषण अपघात; ST बस 400 फूट दरीत कोसळली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून अपघाताचे सत्र सुरूच असून प्रवास करणं सुरक्षित आहे का असा प्रश्न पडत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या बुलढाणा बस अपघाताची घटना अजूनही ताजी असतानाच आता नाशिक येथील सप्तश्रृंगी गड घाटात एसटी बसचा अपघात होऊन तब्बल ४०० फूट खोल दरीत बस कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात १ ठार झाला असून 25 प्रवासी जखमी झाले आहेत.

आज पहाटे 6.30 ते 6.45 दरम्यान हा भीषण अपघात झाला. गडावरून खाली येत असताना या बसला अपघात झाला असून बस थेट 400 फूट दरीत कोसळली आहे. गडावरील शार्प टर्नवर घाटातील गणपती पॉइंटजवळ हा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच सप्तश्रृंगी गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे.

दरम्यान, या अपघातानंतर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनेची माहिती घेत ते सप्तशृंगी गडाकडे रवाना झाले आहेत. या अपघातानंतर जखमींना मदत करण्यासाठी संबंधित यंत्रणेला सर्वोतपरी सूचना दिल्या आहेत. तसेच जे प्रवासी जखमी झाले आहेत त्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून सरकारी खर्चातून सर्वांवर उपचार केले जातील असं दादा भुसे यांनी म्हंटल. तसेच जखमींची कुठलीही गैरसोय होणार नाही. मी स्वतः संपर्कात असून सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे असं दादा भुसे यांनी म्हंटल.