Sara Ali Khan | कंगनानंतर सारा अली खान करणार राजकारणात प्रवेश? अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Sara Ali Khan | अभिनेत्री सारा अली खान ही एक स्टारकीड आहे. तरी देखील तिने बॉलीवूडमध्ये येऊन तिचे असे एक वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. केदारनाथ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी सारा अली खान ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अशातच अभिनेत्रीचा एक जुन्या व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओमध्ये सारा अली खानला राजकारणात प्रवेश करण्याबाबत प्रश्न विचारला गेला होता. यावेळी तिने स्पष्टपणे होकार दिला होता. तिचा हा जुना व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे आता कंगनानंतर सारा अली खान (Sara Ali Khan) राजकारणात प्रवेश करेल का?अशी चर्चा चालू झालेली आहे.

काय म्हणाली सारा?

या मुलाखतीत साराला राजकारणात प्रवेश करण्यात का?असा प्रश्न विचारण्यात आला यावेळी सारा म्हणाली की, हो ती राजकारणात प्रवेश करू शकते. सध्या तिच्या या वक्तव्याची सर्वत्र चर्चा रंगलेली आहे. सारा अली खानने जर राजकारणात प्रवेश केला तर तिच्या चाहत्यांना देखील खूप आनंद होणार आहेत.

साराच्या या जुन्या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केलेला आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करून पाठिंबा देखील दर्शवत आहे. एका युजरने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले आहे की, “हेमा मालिनी रेखा, जया बच्चन, कंगना या राजकारणात प्रवेश करू शकतात तर सारा अली खान देखील करू शकते.”

सारा अली खान वर्कफ्रंट | Sara Ali Khan

सारा अली खान ही सोशल मीडियावर नेहमीच मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील खूप आहे. केवळ तिच्या सौंदर्यामुळे नाही तर तिच्या बिनधास्त स्वभावामुळे देखील अनेकांना सारा आवडते. अभिनेत्री येत्या काळात मर्डर मुबारक आणि ए वतन मेरे वतन या चित्रपटात दिसणार आहे. तिच्या चाहत्यांना देखील या चित्रपटाबाबत खूप उत्सुकता लागलेली आहे.

कंगना रणौत हिचा राजकारणात प्रवेश

अशातच बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौतला हिमाचल प्रदेशामधील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपाने उमेदवारी जाहीर केलेली आहे. बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट केल्यानंतर आता कंगना आणि राजकारणात प्रवेश केलेला आहे. परंतु आता राजकारणातील करियर नक्की कसं वळण घेणार आहे? हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे.