शारदीय नवरात्रोत्सव 2022 : आ. बाळासाहेब पाटील यांच्याकडून दैत्यनिवारणी मंदिर परिसराचा आढावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव 26 सप्टेंबर 2022 पासून सुरू होत आहे, कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर, यंदाचा हा नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. या सर्वांचा विचार घेऊन, कराड येथील प्रसिद्ध दैत्यनिवारणी मंदिर व मंदिर परिसराचा आढावा राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांनी घेतला.

याप्रसंगी डी. वाय. एस. पी. डाॅ. रणजीत पाटील, तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी सौ. मीना साळुंखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कराड येथील प्रसिद्ध व जागृत देवस्थान असणाऱ्या दैत्यनिवरणी मंदिर येथे नवरात्रोत्सवात भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते, त्यासाठी शाहू चौक ते श्री दैत्य निवारणी मंदिर रस्ता व अजंठा ट्रान्स्पोर्ट रोड ते श्री दैत्यनिवारणी मंदिर रस्ता लाईटची व्यवस्था करणे. शाहू चौक ते श्री दैत्य निवारणी मंदिर रस्ता व अजंठा ट्रान्स्पोर्ट रोड ते श्री दैत्यनिवारणी मंदिर रस्त्यावरील खड्डे मुजवणे. मंदिर परिसरात पावसामुळे फरशी / पेव्हर ब्लॉक घसरडे झाले असतील अथवा माती / गाळ आला असेल तर त्याची स्वच्छता करणे.

शाहू चौक ते श्री दैत्य निवारणी मंदिर रस्ता व अजंठा ट्रान्स्पोर्ट रोड ते श्री दैत्यनिवारणी मंदिर रस्त्याच्या दोन्ही बाजूची गटर्स स्वच्छ करणे तसेच गटरजवळ गवत / झुडपे असतील तर त्याचीही स्वच्छता करणे. जुन्या कोयना पुलावरील बोर्ड व्यवस्थित लावणे व स्वच्छता करणे. मिक्सर मशिन (टॅक्टर) बाजूला लावण्याची व्यवस्था करणे. नवरात्र काळात डास, मच्छर इत्यांदिच्या बंदोबस्तासाठी पावडर, किटकनाशकाची फवारणी करणे. यशवंतराव चव्हाण सभागृह परिसराची स्वच्छता करणे. महिलांची दर्शन रांगेची व्यवस्था करणे . सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदोबस्ताची व्यवस्था करणे. पादत्राणे स्टॅन्डची व्यवस्था करणे व वाहनाच्या पार्कींगची व्यवस्था करणे. हार, नारळ, ओटी साहित्य इत्यादि विक्रेते यांची बैठक व्यवस्था करणे, तसेच स्वच्छतागृहाची व्यवस्था करणे याबाबत आढवा घेतला. सदर सुविधा तातडीने उपलब्ध करणेबाबतच्या सूचना आमदार बाळासाहेब पाटील यांनी केल्या.