Saree Cancer | महिलांप्रमाणे पुरुषांनाही साडी कॅन्सरचा धोका; संशोधनात आली नवी माहिती समोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Saree Cancer | आजकाल लोकांची जीवनशैली बदलत चालल्यामुळे अनेक आजारांचा धोका देखील वाढलेला आहे. त्यात कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. कॅन्सरचे नाव घेतले, तरी अनेक लोकांना भीती वाटते. महिलांमध्ये आता एका नवीन कॅन्सरची भीती निर्माण झाली आहे. तो म्हणजे साडी कॅन्सर. (Saree Cancer) हा कॅन्सर महिलांमध्ये दिसून येतो. ज्या महिला वर्षांपासून घालत असतात. त्यांना या कॅन्सरचे निदान झाल्याची माहिती समोर आली आहे. परंतु हाती आलेल्या माहितीनुसार पुरुष देखील या साडी कॅन्सरला बळी पडत आहेत. आता याबद्दल आरोग्य तज्ञ काय म्हणतात? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

साडी कॅन्सर हा एक नवीन प्रकारचा कॅन्सर आहे. भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रिया गेल्या अनेक वर्षापासून साडी नेसतात. त्यामुळे त्यांना हा कॅन्सर होतो. परंतु महिलांसोबत पुरुषांनाही आता साडी कॅन्सरचे निदान झालेले आहे. साडीच्या कर्करोगाचा संबंध हा साडीशी नसून साडी खाली घातल्या जाणाऱ्या पेटिकोटशी आहे. 1945 मध्ये धोती कॅन्सर नावाचा कॅन्सर आला होता. पुरुषांनी कमरेला घट्ट धोतर बांधल्याने हा कॅन्सर होत होता. त्याचप्रमाणे आता घट्ट पेटिकोट किंवा घट्ट जीन्स घातल्यामुळे देखील हा कर्करोग होत आहे.

2011 मध्ये या बाबतची 2 प्रकरणे देशात आढळली होती. घट्ट साडी बांधल्याने कमरेच्या त्वचेखाली जखमा होतात. त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. साडीच्या या कर्करोगाला वैद्यकीय भाषेत वेस्ट लाईन कॅन्सर असे देखील म्हणतात. हा त्वचेच्या कर्करोगाचा एक प्रकार आहे. तज्ञांच्या मते जेव्हा आपण घट्ट पेटीकोट, साडी किंवा जीन्स घटल्यो. तेव्हा खूप जळजळ आणि खाज सुटते. त्याचबरोबर जास्त वेळ घट्ट कमरेला असल्याने त्वचेवर जखमा तयार होतात. आणि त्याचमुळे साडीचा कॅन्सर होऊ शकतो. आता महिलाप्रमाणे पुरुषांना देखील या कर्करोगाचा धक्का आहे.