नूतनीकरण केलेल्या जलतरण तलावाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

जिल्हा क्रीडा संकुल समिती, सातारा अंतर्गत श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल जलतरण तलाव, फिल्ट्रेशन प्लॅन्टचे 1 कोटी 35 लाख रुपयांतून नुतणीकरण करण्यात आले आहे. या नूतनीकरण केलेल्या जलतरण तलावाचे काल जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते उद्धघाटन करण्यात आले.

सातारा येथे पार पडलेल्या उद्धघाटन कार्यक्रमास जिल्हाधिकारी जयवंशी यांनी ठेकेदार यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. तसेच या सुविधेचे सातारा जिल्ह्यातील अद्ययावत सुविधा उपलब्ध होत असल्याबाबत समाधान व्यक्त केले.

जलतरण तलावामुळे सातारकर व विद्यार्थ्यांना पोहण्यासाठी एक हक्काचे ठिकाण प्राप्त झाले आहे. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, आंतरराष्ट्रीय पंच नवनाथ ढमाळ, ठेकेदार मिलींद कदम, अभिजीत पाटील, प्रमोद भगत आदी उपस्थित होते.