Satara News : चोरट्यांची आंतरराज्यीय टोळी जेरबंद!! 18 गाड्यांसह कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल सातारा गुन्हे शाखेकडून जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
पोलीस अभिलेखावरील आरोपीकडून १,१५,००,०००/- रुपये किमतीची १० चारचाकी वाहने आणि इतर तीन आरोपींच्याकडून ३,२०,०००/- रुपये किमतीच्या ८ चोरीच्या मोटार सायकल असा एकूण ३,१८,२०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आंतरराज्यीय टोळी जेरबंद करण्याची रेकॉर्डब्रेक कारवाई सातारा स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. याप्रकरणी तब्बल ७ जणांना पोलिसानी अटक केली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, सातारा जिल्हयातील वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक समीर शेख आणि अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या होत्या. त्याअनुशंगाने पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली तीन तपास पथक तयार केले . दि.३०/०४/२०२३ रोजी श्री. अरुण देवकर यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, पोलीस अभिलेखावरील आरोपी अजिम सलीम पठाण वय ३८ वर्षे, रा. रहिमतपूर ता.कोरेगाव जि.सातारा याने परराज्यातून चोरी झालेली चारचाकी वाहने आणून ती सातारा तसेच रायगड आणि सोलापूर जिल्हयामध्ये विक्री केली आहेत. त्याप्रमाणे त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र मोरे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांना नमुद आरोपीस ताब्यात घेवून त्याचेकडे तपास करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्याअनुशंगाने तपास पथकाने पोलीस अभिलेखावरील आरोपी अजिम सलिम पठाण व कोल्हापूर येथील एक इसम याच्या ठावठिकाण्याबाबत गोपनिय माहिती प्राप्त करून त्याला रहिमतपूर ता. कोरेगाव येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला शाहुपूरी पोलीस ठाणे गु.र.नं. १२३/२०२३ भादविक ३७९ या गुन्हयामध्ये अटक केली. आरोपीची सखोल आणि कसून चौकशी केली असता त्याने परराज्यातून एकूण ७ चोरीची चारचाकी वाहने आणून ती सातारा व रायगड जिल्हयामध्ये विक्री केल्याचे सांगून शाहुपूरी पोलीस ठाणे गु.र.नं.१२३/२०२३ भादधिक ३७९ या गुन्हयात चोरी केलेली मारुती सुझुकी बॅगर आर कार तसेच दिल्ली व उत्तरप्रदेश राज्यामध्ये चारी केलेल्या इनोव्हा क्रिस्टा-१, क्रेटा-४. मारुती ब्रिझा-१, होंडा सिटी-१, मारुती स्विफ्ट १, मारुती बलेनो-१ अशा चोरीच्या १,१५,००,०००/- (एक कोटी पंधरा लाख रुपये किमतीच्या) एकूण १० चारचाकी गाड्या जात करून गाड्या चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटचा पर्दाफाश करून त्यांना जेरबंद केले आहे.

दुसरीकडे, भुईंज पोलीस ठाणे हद्दीत एका इसमास धक्काबुक्की व मारहाण करुन त्याची होंडा अॅक्टीव्हा मोपेड व खिशातील १,८३० रुपये रोख रक्कम जबरीने चोरून नेल्याबाबत भुईज पोलीस ठाणे गु.र.नं. १५३/२०२३ भादविक ३९२, ३४ अन्वये गुन्हा नोंद आहे. त्याप्रमाणे अरुण देवकर यांनी पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांना व त्याचे पथकास नमुद आरोपींना ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. नमुद तपास पथकाने प्राप्त माहितीमधील आरोपीच्या ठावठिकाण्याबाबत गोपनिय माहिती काढून त्यांना ताब्यात घेतलं. तसेच नमुद गुन्हयात चोरीस गेलेली होंडा अॅक्टीव्हा मोपेड तसेच आरोपी महेश रामचंद्र अवघडे व त्याचे इतर दोन साथीदारांनी सातारा शहर, पाटण, किनी टोलनाका तसेच इतर ठिकाणाहून चोरी केलेल्या ७ मोटार सायकल अशा एकूण ३,२०,०००/- रुपये किमतीच्या चोरीस गेलेल्या मोटार सायकल जप्त करण्यात आल्या.

अटक आरोपींची नावे :-

चारचाकी वाहन चोरीमधील आरोपींची नावे-

१) अजिम सलिम पठाण वय ३८ वर्षे, रा.रहिमतपूर ता. कोरेगाव जि. सातारा
२) अजित आण्णाप्पा तिपे वय ४० वर्षे रा.कोल्हापूर

मोटार सायकल चोरीमधील आरोपींची नावे-

१) महेश रामचंद्र अवघडे वय २५ वर्षे रा.कोडोली ता.जि.सातारा.
२) संतोष मारुती बाबर वय २० वर्षे रा.बाबाची वाडी ता.कोरेगाव जि. सातार
३) वैभव प्रमोद बाबर वय २३ वर्षे रा.कोंडवे ता.जि. सातारा
४) कृष्णत रत्नकांत काकडे वय २६ वर्षे रा.मसूर ता.कराड जि.सातारा
५) अमित राजेंद्र बैले वय १९ वर्षे रा.उंब्रज ता.कराड जि.सातारा

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रविंद्र भोरे पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे, मदन फाळके, मधुकर गुरव, पोलीस अंमलदार उत्तम दधडे, सुधीर बनकर, तानाजी माने, अतिश घाडगे, संतोष पवार, विजय कांबळे, संजय शिर्के, संतोष सपकाळ, शरद बेचले, साधीर मुल्ला, मंगेश महाडीक, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमोल माने, मुनीर मुल्ला, दिपाली यादव, निलेश काटकर, प्रविण कांबळे, अजित कर्णे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, गणेश कापरे, विक्रम पिसाळ, स्वप्नील माने, अर्जुन शिरतोडे, शिवाजी भिसे, विशाल पवार, मोहन पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, प्रविण पवार, स्वप्नील दौड, मयुर देशमुख, धीरज महाडीक, मोहसिन मोमीन, शिवाजी गुरव, सी. सी. टी. एन. एस विभागाचे अनिल धुमाळ, बाळासाहेब जानकर, सायबर विभागाचे अजय जाधव, अमित झेंडे यांनी सदरची कारवाई केलेली असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.