Sunday, May 28, 2023

Satara News : 17 घरफोडी करत 34 लाख 72 हजारांचे सोने- चांदीचे दागिने लुटणाऱ्या चोरट्यास अटक

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा आणि कोरेगाव तालुक्यातील 17 ठिकाणी घरफोड्या टाकत सोन्या-चांदीचे दागिने लुटणाऱ्या चोरट्यास सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने नुकतीच अटक केली आहे. संजय मदने असे दरोडा टाकणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून तब्बल 17 घरफोडी करत 34 लाख 72 हजारांचे सोने- चांदीचे दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले.

याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा आणि कोरेगाव तालुक्यातील वडुथ, बोरखळ, मालगाव, जळगाव, तडवळे, खेड, नांदगिरी, चिमणगाव देऊर वाठार येथे गेल्या काही दिवसांपूर्वी घरपोडीच्या घटना घडल्या होत्या. या घरफोडीत चोरट्याकडून सुमारे 17 घरफोडी करत 34 लाख 72 हजारांचे सोने- चांदीचे दागिने लुटण्यात आले होते. याबाबत सातारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांकडून तपास केला जात होता. त्यांच्याकडून तपास केला जात असताना त्यांना एका संशयित अढळ आढळून आला. यावेळी त्यांनी त्याकडे चौकशी केली असता. त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली.

दरम्यान, पोलिसांनी संबंधित चोरट्यास अटक केली असून त्याच्याकडून 34 लाख 72 हजाराचे 62 तोळे सोने आणि 4 हजार रुपयाची चांदी जप्त केली आहे. याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे.