सातारा जिल्ह्यात ऊस गाळपसह साखर उत्पादनात ‘हा’ कारखाना अव्वल…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या यंदाच्या गळीत हंगामाची नुकतीच सांगता झाली आहे. जिल्ह्यातील 99 लाख 23 हजार 837 मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. तर 10.33 टक्के सरासरी उताऱ्यानुसार जिल्ह्यात 102 लाख 47 हजार 725 क्विंटलइतके साखरेचे उत्पादन हाती आले असल्याची माहिती पुणे साखर आयुक्तालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यात ऊस गाळप आणि साखर उत्पादनात जरंडेश्वर हा खासगी कारखाना तर साखर उताऱ्यात सह्याद्री सहकारी कारखाना अव्वल ठरला आहे. चालू वर्षी राज्यात साखर उत्पादनामध्ये विलक्षण घट झाली आहे. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्व कारखान्यांचा गळीत हंगाम 26 मार्च अखेर अटोपला आहे. केवळ अजिंक्यतारा कारखान्याने 14 एप्रिल अखेर गळीत हंगाम सुरू ठेऊन 7 लाख 5 हजार 886 मेट्रीक टन ऊसाचे गाळप 11.22 टक्के उताऱ्यासह 7 लाख 92 हजार 345 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच प्रतिदिन 10 हजार मेट्रीक टन गाळप क्षमता असलेल्या जरंडेश्वर गुरू कमोडिटी या खासगी कारखान्याने 18 लाख 18 हजार 421 मेट्रीक टनाइतके गाळप पूर्ण केले आहे. 10.04 टक्के सरासरी उताऱ्यानुसार 18 लाख 26 हजार 500 क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केले आहे. त्या खालोखाल कृष्णा सहकारी साखर कारखान्याने 10 लाख 60 हजार मेट्रीक टनाइतके ऊस गाळप पूर्ण केले आहे.

शेतकरी मित्रांनो सध्या अनेक शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करून हायटेक शेतीतून आपला नफा दुप्पट करत आहेत. यासाठी Hello Krushi अँप शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत आहे. नवनवीन तंत्रज्ञान, उपकरणे यांची माहिती या अँपवर आहे. तसेच शेतकरी ते ग्राहक अशी थेट खरेदी विक्रीही या अँपच्या माध्यमातून करता येते. तुम्हीही स्वतः अनेक पिकाची माहिती घेत उत्तम शेती करू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Hello Krushi हे ॲप Download करून Install करा. याव्यतिरिक्त Hello Krushi मध्ये तुम्हाला सातबारा उतारा, जमीन मोजणी, बाजारभाव, हवामान अंदाज यांसारख्या सुविधाही मिळतील. त्यासाठी हॅलो कृषी डाउनलोड करा.

Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here

या कारखान्याचा उतारा 10.75 टक्के असून 11 लाख 39 हजार 500 क्विंटल साखर उत्पादन तयार करीत दुसरे स्थान मिळविले आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने 9 लाख 11 हजार 907 मेट्रीक टन ऊस गाळप आणि 12.49 टक्के सरासरी उच्चांकी उताऱ्यानुसार 11 लाख 47 हजार 660 क्विटलइतके साखरेचे उत्पादन तयार केले आहे.