Satara Lok Sabha 2024 Results : सातारा लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण आकडेवारी पाहा एका क्लिकवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साताऱ्यात यंदा मान गादीला आणि मतही गादीला असं चित्र पाहायला मिळालं. मतदानानंतर ते निकालाच्या दिवसायापर्यंत फक्त तुतारीची हवा पाहायला मिळत होती. मात्र अखेरच्या क्षणी राजेंनी मतमोजणीत गती घेतली आणि ३०००० हुन अधिक मतांनी दणदणीत विजय मिळवला. सर्व एक्झिट पोलमध्ये शिंदे आघाडीवर दाखवत असताना राजेंनी अनपेक्षित विजय मिळवत साताऱ्यात पवारांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडलं. साताऱ्यात उदयनराजे नावाच असलेले वलय, भाजपचे मजबूत संघटन, मोदींची सभा, अजित पवारांच्या गटाने केलेलं काम यामुळे उदयराजेना फायदा झाला असं म्हंटल पाहिजे. राजेंच्या या विजयानंतर साताऱ्यातील कोणत्या भागात कोणाला कोणाला किती मताचे लीड मिळाले याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच लागली असेल.. चला तर मगवसाताऱ्यात विधासभा मतदारसंघनिहाय आकडेवारी सविस्तर जाणून घेऊयात..

तस म्हटलं तर सातारा लोकसभा हा एकूण ६ मतदार संघाच्या अंतर्गत येतो… यामध्ये सातारा, कोरेगाव, वाई, कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण या मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये सातारा मध्ये भाजपचे शिवेंद्रसिंह राजे भोसले, वाईमधून अजितदादा गटाचे मकरंद पाटील, कोरेगाव मध्ये शिंदे गटाचे महेश शिंदे, कराड दक्षिण मध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, कराड उत्तर मध्ये शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील आणि पाटणमध्ये शिंदे गटाचे शंभूराज देसाई आमदार आहेत. म्हणजेच काय तर महायुतीकडे ४ तर महाविकास आघाडीकडे २ आमदारांचं बळ होतं. महाविकास आघाडीची संपूर्ण भिस्त कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटणवर होती. मात्र या भागात अपेक्षित लीड शशिकांत शिंदेंना मिळालं नाही. याउलट सातारा, कोरेगाव आणि वाई मधील मताधिक्याने राजेंना विजयात हातभार लावला…

चला आता पाहुयात कोणत्या मतदारसंघात कोणाला किती मते मिळाली….

सातारा विधानसभा मतदारसंघात उदयनराजेंना ११६९३८ मते मिळाली तर शशिकांत शिंदेंना अवघी ८०७०५ मते मिळाली… म्हणजेच ३६,२३३ मताची मोठी आघाडी मिळाली. त्यानंतर कोरेगाव मतदारसंघात उदयनराजेंना १०३९२२ मते मिळाली तर दुसरीकडे शशिकांत शिंदे यांचे होम ग्राउंड असूनही कोरेगावात त्यांना अवघी ९७०६७ मतदान झालं. म्हणजेच कोरेगावात सुद्धा शशिकांत शिंदे ६८५५ ने पिछाडीवर गेल्याचे पाहायला मिळालं. यानंतर पुढचा मतदारसंघ तो म्हणजे वाई… वाई मतदारसंघात शिंदेंच्या तुतारीला ९७४२८ मते पडली तर उदयनराजेंना ९०६८५ मतदान झालं म्हणजे ६७४३ मतांची आघाडी शशिकांत शिंदेंना मिळाली. यानंतर आपण जाऊयात उत्तर कराडमध्ये …. तर याठिकाणी शशिकांत शिंदेंना ९०६५४ मते पडली तर उदयनराजेंना ८८९३० मते झाली म्हणजेच उत्तर कराड मध्ये अवघ्या १७२४ मतांची मामुली आघाडी शिंदेंना मिळाली.

त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण प्रतिनिधित्व करत असलेल्या कराड दक्षिण मध्ये शशिकांत शिंदेंना ९२१९८ मते मिळाली तर उदयनराजेंना ९२८१४ मते मिळाली.. म्हणजेच महाविकास आघाडीची ताकद असूनही दक्षिण कराडात शिंदे ६१२ मतांनी मागे पडल्याचे दिसत आहे. आता आपण येउयात शेवटच्या पाटण मतदारसंघात…. पाटणमध्ये शशिकांत शिंदेंच्या तुतारीला ७८४०३ मते मिळाली तर उदयनराजेंना ७५४६० हजारांचे मतदान झाल्याने याठिकाणी २९७० मतांचे लीड मिळालं…. एकूण मतांची मांडणी केली तर शशिकांत शिंदेंच्या पारड्यात ५३८३६३ मते मिळाली तर उदयनराजेंच्या कमळाला ५७११३४ मते मिळाली… अशा पद्धतीने ३२७७१ मतांनी उदयनराजेंनी साताऱ्यात दणदणीत विजय मिळवला आणि शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला हादरा दिला… सातारा मतदारसंघात उदयनराजेंना मिळालेलं एकगट्टा लीड शशिकांत शिंदेंसाठी धोक्याचं ठरलं…