व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Satara News : पोहायला गेलेल्या 17 वर्षीय मुलाचा मृत्यू, शेवटची उडी मारून येतो म्हणला, अन् पुढे…

पाटण | मित्रांसोबत पोहायला गेलेल्या एका तरुण मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सातारा जिल्ह्यात घडली आहे. ओंकार धर्मेंद्र लोहार (वय- 17 ) असे सदर मृत पावलेल्या मुलाचे नाव असून तो तारळी नदीवर असलेल्या केटीवेअर बंधाऱ्यात मित्रांसोबत पोहायला गेला होता. यावेळी बंधाऱ्यातील प्लेटमध्ये अडकल्याने ओंकारचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे. तर लोहार कुटुंबीयांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, ओंकार लोहार हा १७ वर्षांचा तरुण आपल्या मित्रांसह धनगरवाडीजवळील दुपारी चारच्या सुमारास पोहायला गेला होता. शेवटची उडी मारून घरी जाऊया असे म्हणत त्याने बंधाऱ्यात उडी मारली. मात्र, तो वर आलाच नाही. मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी नातेवाइकांना कल्पना दिली.तसेच यावेळी ग्रामस्थ व पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तरूणांनी पाण्यात उड्या मारीत शोध घेण्याचा प्रयत्न केला असता एका दरवाजाजवळ त्याचा मृतदेह हाताला लागत होता; पण त्याचे दोन्ही पाय लोखंडी प्लेटमध्ये अडकले होते. त्यामुळे बंधाऱ्याच्या प्लेटा काढण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यानंतर मोठ्या दोराच्या साह्याने प्लेटा काढल्यावरच मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

कोल्हापूर पध्दतीचा बंधाऱ्यावर पाणी आडविण्यासाठी लोखंडी प्लेट लावून पाणी साठवले जाते. मात्र, दोन प्लेटमध्ये गॅप राहात असताना काढला गेला नव्हता. यामुळे पाण्याची गळती होत होती. याकडे अनेकदा लक्ष वेधले होते. तरीही संबधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने या प्लेटच्या गॅपमध्ये ओंकारचा पाय अडकला आणि यामध्येच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप उपस्थित लोकांनी केला.