Satara News : इलेक्ट्रॉनिक बसेस सोबत सातारा – स्वारगेट प्रवास होणार आरामदायक; किती आहेत दर ? जाणून घ्या

satara news
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Satara News : राज्यातले दुसरे सर्वात महत्त्वाचे शहर म्हणून पुणे शहराची ओळख आहे. पुण्यामध्ये शिक्षण आणि नोकरी, कामानिमित्त येणाऱ्यांची काही कमी नाहीये. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येथे लोक ये जा करत असतात. याच पद्धतीने सातारा जिल्ह्यातून देखील अनेक प्रवासी पुण्यासाठी प्रवास करत असतात. सातारा ते पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता एक खुशखबर असून एसटी महामंडळाच्या ताब्यात पाच ई बसेस दाखल झाल्या असून या ई बसेस सातारा ते स्वारगेट या मार्गावर दररोज धावणार आहेत. विशेष म्हणजे ही सेवा विना थांबा असणार (Satara News) आहे. चला जाणून घेऊया या सेवेबद्दल…

सातारा विभागासाठी पाच इलेक्ट्रॉनिक बसेस दाखल झाल्या आहेत. त्याचबरोबर आणखी काही दिवसांमध्ये पाच इलेक्ट्रॉनिक बसेस येणार आहेत. अशा प्रकारे एकूण सातारा ते स्वारगेट या महामार्गावर एकूण दहा इलेक्ट्रॉनिक बसेस धावणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी (Satara News) ज्योती गायकवाड यांनी माध्यमांना दिली आहे.

काय आहेत बसची वैशिष्ट्ये ? (Satara News)

  • सातारा आगारात दाखल झालेल्या ई-बसेस मधून प्रवास करणे सुखकारक आणि आरामदायी असणार आहे
  • या इलेक्ट्रॉनिक गाडीची लांबी 9 मीटर आहे.
  • या गाडीची क्षमता 34 सीटर आहे. त्याचबरोबर प्रत्येक सीटवर मोबाईल चार्जिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
  • या बसला एअर सस्पेन्शन देण्यात आले आहे.
  • ही बस 2 तासात चार्ज होते. त्याचबरोबर सातारा आगारातही चार्जिंग पॉइंट तयार करण्यात आले आहे. एकदा ही बस चार्ज केल्यानंतर 200 किलोमीटर धावते.

किती आहे तिकीट दर ? (Satara News)

सातारा ते स्वारगेट या बसच्या 24 फेऱ्या होणार आहेत. तर सध्या 5 बसेस असल्यामुळे 12 फेऱ्या होणार आहेत. यासाठी सातारा ते स्वारगेटचे शुल्क 245 रुपये आहे. तर स्वारगेट ते सातारा 230 रुपये इतके शुल्क आकारण्यात आले आहे. त्याचबरोबर महामंडळाच्या माध्यमातून सर्व प्रवाशांना सर्व सवलती लागू होणार आहेत. फक्त विद्यार्थ्यांना पासेस सोडून सर्व सवलती सुरू करण्यात आल्या आहेत.