Satara News : माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या पुणे आणि साताऱ्यातील घरांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. सकाळी सहा वाजल्यापासून संजीवराजे यांच्या बंगल्यात तपास सुरू असून, आयकर विभागाचे अधिकारी चौकशी (Satara News) करत आहेत. बंगल्यामध्ये सध्या कोणालाही प्रवेश दिला जात नाही आहे.
सहकाऱ्यांवरही छापे (Satara News)
संजीवराजे यांच्यासह रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी देखील केंद्रीय तपास यंत्रणेने धाड टाकली आहे. फलटणमधील मलठण येथे देखील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. याशिवाय, संजीवराजे यांचे सहकारी रणवरे यांच्या घरावरही छापा टाकून चौकशी सुरू आहे.
रामराजे निंबाळकरांचे आवाहन
दरम्यान, रामराजे निंबाळकर यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसद्वारे आवाहन केले (Satara News) आहे. त्यांनी म्हटले आहे की, “कृपया गर्दी करू नका. आयकर खात्याला काम करू द्या. काळजी नसावी.”
इंदापूरमधील छापेमारी आणि नेचर डिलाईट प्रकरण
फलटण पाठोपाठ इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे देखील छापेमारी करण्यात आली आहे. नेचर डिलाईटचे अर्जुन देसाई यांच्या घरी केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी सकाळपासून उपस्थित असून कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. यासोबतच, देसाई यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्या ठिकाणी सर्वसामान्यांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
व्यावसायिकांवरही चौकशी
नेचर डिलाईटचे व्यावसायिक भागीदार मयूर जामदार यांच्या घरीही तपास सुरू आहे. तसेच, नेचर डिलाईट डेअरीच्या कळस येथील ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणांनी कसून चौकशी सुरू केली आहे. इंदापूर-बारामती मार्गावरील चिखली फाट्याजवळील (Satara News) देसाई हॉस्पिटल येथे देखील तपास यंत्रणांनी छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे.
या छापेमारीमुळे सातारा, पुणे, फलटण आणि इंदापूर या भागांत खळबळ उडाली असून केंद्रीय तपास यंत्रणांकडून कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू आहे. संबंधित अधिकारी तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही अधिकृत खुलासा न करण्याच्या (Stara News) भूमिकेत आहेत.