Satara News : सातारा जिल्ह्यातील अनाधिकृत 9 शाळा बंद करण्याचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची कोणतीही मान्यता न घेता सातारा जिल्ह्यात 9 अनधिकृत शाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. शैक्षणिक वर्ष संपायच्या आधी या शाळा बंद करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. यामध्ये सातारा तालुक्यातील दोन, खटाव तालुक्यातील पाच आणि पाटण तालुक्यातील दोन अशा एकूण नऊ शाळांचा समावेश आहे.

त्यानुसार या शाळांना शिक्षणाधिकाऱ्यांनी नोटीस बजावले असून या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान यामुळे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नसल्याचे शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले. अशा अनाधिकृत शाळा गेल्या अनेक दिवसापासून सुरू असताना त्याच्यावर कारवाई का केली नाही, असाही सवाल आता पालकांकडून उपस्थित केला जात आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील 9 शाळांची पुढीलप्रमाणे
सातारा तालुक्यातील अजिंक्य डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल मोळाचा ओढा, टॅलेन्ट स्कूल गोजेगाव, खटाव तालुक्यातील बचपन ई मीडियम स्कूल वडूज, पोदार माय लर्न स्कूल वडूज, ट्रिनिटी इंग्लिश मीडियम स्कूल सातेवाडी, पवार पब्लिक स्कूल पुसेसावळी, सनशाईन स्कूल खटाव आणि पाटण तालुक्यातील लिटील अॅजल इंग्लिश स्कूल चाफळ, नॅशनल गुरुकुल स्कूल चाफळ या शाळांना शिक्षण विभागाने नोटिसा पाठविल्या आहेत.