Wednesday, February 8, 2023

Satara News : पुणे बंगलूर महामार्गावर टोल कर्मचार्‍यांची वाहन चालकाला मारहाण; पहा Video

- Advertisement -

कराड : पुणे बंगलूर महामार्ग नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतो. आज कराड शहराजवळील तासवडे टोलनाक्यावर टोल कर्मचार्‍यांनी वाहन चालकाला मारहान केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल होतो आहे. मारहाणीची घटना सीसीटिव्ही कॅमेर्‍यांत कैद झाली असून महामार्ग पोलिस याची चौकशी करत आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, कराड शहरा जवळ तासवडे टोल नाक्यावर टोल कर्मचारी अन वाहन चालक यांच्यात वादावादीची घटना घडली. वादावादीचे रुपांतर मारहाणीत झाल्याने काहीवेळासाठी वातावरण तणावाचे बनले होते. कर्मचाऱ्यांनी यावेळी वाहन चालकाला मारहाण केल्याची घटना CCTV मध्ये कैद झाली आहे.

- Advertisement -

व्हिडिओ शूटिंग करणाऱ्या पत्रकारालाही अरेरावी, दमदाटी व शिवीगाळ करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. तासवडे टोलनाक्यावर वारंवार कर्मचाऱ्यांकडून धमकी देण्याचे प्रकार घडत असतात. स्थानिकांनाही अनेकदा या कर्मचाऱ्यांमध्ये त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तासवडे टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांची गुंडागर्दी कधी थांबणार असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.