Satara News : सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Satara News Collectorate office Bomb
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Satara News । साताऱ्यातून एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे.सातारा जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. आज दुपारी 3:15 वाजता साताऱ्यातील कलेक्टर ऑफिस उडवून देणार असल्याची दिली धमकी मिळाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने चेन्नई वरून हा धमकीचा मेल केला असल्याचं समोर आलं आहे. या धमकीमुळे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कलेक्टर ऑफिस परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला- Satara News

महत्वाची बाब म्हणजे आज सकाळीच ११ वाजून ३० मिनिटांनी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेज उडवून देण्याच्या धमकीचा फोन झाला होता अन् आता जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देण्याची धमकी आली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर कलेक्टर ऑफिस परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कार्यालयातील सर्व दुचाकी,चारचाकी गाड्या बाहेर काढण्यात आल्या.. एकीकडे पावसाचं वातावरण असतानाही भर पावसात बॉम्ब स्कॉड पथक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झालं असून शोधकार्य सुरू आहे. Satara News

पालघर मध्येही असाच काहीसा प्रकार घडला आहे. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ई-मेल आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सुरुवातीला हा ‘मॉक ड्रिल’चा प्रकार असावा असे वाटत होते. परंतु नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आकाश भास्करन डीएमके केविंग केअर या नावाने हा ई-मेल आल्याचे अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, मुंबईतील ताजमहल हॉटेल आणि विमानतळ बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी गेल्या दोन दिवसांपूर्वीच मिळाली होती. त्यानंतर आता पालघर आणि सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे.